‘वीज’चोरांना बसणार ‘शॉक’! महावितरणची १० नवीन भरारी पथकांची स्थापना

90

पुण्यात वीजचोरांना ‘शॉक’ देण्यासाठी महावितरणने १० नवीन भरारी पथकांची स्थापना केली आहे. त्याद्वारे एप्रिल ते जून या तीन महिन्यांत तब्बल १३१ कोटी ५० लाख रुपयांची वीज चाेरी उघड झाली आहे. यात २ हजार ६२५ प्रकरणे उघड झाली. त्यांच्याकडून ५४ कोटी १६ लाख ६६ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. वीजचोरी, विजेचा गैरवापर आणि इतर अनियमिता आटोक्यात आणण्यासाठी तसेच वीजचोरांविरुद्ध जलद कारवाई करण्यासाठी हे पथके काम करत आहे.

वीजचोरी करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा

वीजचोरीमुळे नियमित वीजबिल भरणाऱ्या प्रामाणिक वीज ग्राहकांवर वीज दरवाढीचा बोजा पडतो. अशा प्रामाणिक व नियमित वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांचे हित जपणे गरजेचे आहे, त्यामुळे महावितरणने वीजचोरी करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे.

(हेही वाचा – दहीहंडीला खेळाचा दर्जा! पुढील वर्षापासून ‘प्रो गोविंदा’ स्पर्धा; मुख्यमंत्र्यांची घोषणा)

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी नुकतीच सुरक्षा व अंमलबजावणी विभागाची आढावा बैठक घेतली. महावितरणची आर्थिक घडी सुधारण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून वीजचोरी करणाऱ्या विरोधात कडक कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे भरारी पथकांनी अधिक सक्षमपणे काम करून वीज चोरीस लगाम घालावा, असे निर्देश सिंघल यांनी दिले.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.