बिग बॉस फेम सिद्धार्थ शुक्ला याचा अकाली मृत्यू

टीव्ही मालिकेतील प्रथितयश चेहरा आणि बिग बॉस फेम सिद्धार्थ शुक्ला याचे ह्रदय विकाराच्या झटक्याने अचानक निधन झाले. त्यामुळे सिनेसृष्टीला धक्का बसला आहे. यामुळे पुन्हा एकदा सिने सृष्टीतील वाढत्या ताणतणावाचा विषय चर्चेला आला आहे. गुरुवारी, जुहू येथील कूपर रुग्णालयात सिद्धार्थ शुक्ला याने शेवटचा श्वास घेतला. २००८ पासून सिद्धार्थ याने त्यांचे सिने करियरला सुरुवात केली होती. मात्र अवघ्या ४०  त्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने सर्वांना दुःख झाले आहे.

सिद्धार्थची कारकीर्द

सिद्धार्थ मुळचा मुंबईचा होता. सिद्धार्थला नेहमीच बिझनेस करायचा होता. मात्र, त्याच्या राहणीमानचे लोक कौतुक करायचे. २००४ मध्ये एकदा, आईच्या सांगण्यावरून सिद्धार्थने मॉडेलिंग स्पर्धेत भाग घेतला. पोर्टफोलिओ न घेता सिद्धार्थ तिथे पोहोचला होता. ज्युरीने सिद्धार्थचा लूक पाहून त्याची निवड केली होती. इथूनच त्याच्या प्रवासाची सुरुवात झाली होती. अभिनेता, होस्ट आणि मॉडेल ओळखला जाऊ लागलेला सिद्धार्थ हिंदी टेलिव्हिजन आणि चित्रपटांमध्ये प्रामुख्याने काम करत होता. तो ‘ब्रोकन बट ब्यूटीफुल 3’, ‘बालिका वधू’ आणि ‘दिल से दिल तक’मधील भूमिकांसाठी ओळखला जातो. तो बिग बॉस १३ आणि फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी ७ च्या रिअॅलिटी शोचा विजेता आहे. त्याने सावधान इंडिया आणि इंडियाज गॉट टॅलेंट हे शो होस्ट केले आहेत. त्याने डिसेंबर २००४ मध्ये आशिया, लॅटिन अमेरिका आणि युरोपमधील इतर ४० सहभागींना हरवून जगातील सर्वोत्कृष्ट मॉडेलचे विजेतेपद पटकावले. २००८ च्या ‘बाबुल का आंगन छुटे ना’ या शोमधील मुख्य भूमिकेतून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. २०१४ मध्ये, शुक्लाने ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’मध्ये सहाय्यक भूमिकेतून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here