राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविषयी वादग्रस्त पोस्ट केल्या प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शरद पवारांविषयी केलेल्या आक्षेपार्ह पोस्टसंदर्भात केतकी चितळेला ताब्यात घेतले आहे. तिच्या विरोधात तीन ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. याच तक्रारीवरुन ठाणे पोलिसांनी केतकी चितळेला ताब्यात घेतले आहे. सध्या या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रांचकडून सुरु आहे.
शरद पवारांवर केलेल्या आक्षेपार्ह पोस्टनंतर, राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाले होते. केतकीवर गुन्हे दाखल करण्यात आले होते, त्याच प्रकरणी आता केतकी चितळेला ताब्यात घेण्यात आले आहे.
नेमकी ती पोस्ट काय
तुका म्हणे पवारा| नको उडवू तोंडाचा फवारा| ऐंशी झाले आता उरक| वाट पाहातो नरक| सगळे पडले उरले सुळे| सतरा वेळा लाळ गळे| समर्थांचे काढतो माप| ते तर तुझ्या बापाचेही बाप| ब्राम्हणांचा तुला मत्सर| कोणरे तू| तू तर मच्छर| भरला तुझा पापघडा| गप नाही तर होईल राडा| खाऊन फुकटचं घबाड| वाकडं झालं तुझं थोबाड| याला ओरबाड त्याला ओरबाड| तू तर लबाडांचा लबाड| … अशी ही कविता आहे.
( हेही वाचा केतकी चितळेचा राज ठाकरेंनीही केला निषेध! म्हणाले, ही मानसिक विकृती! )
गुन्हा दाखल करण्यात आला होता
राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत केलेल्या फेसबुक पोस्टने अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा एकदा चर्चेत आली. फेसबुकवर शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त पोस्टमुळे केतकीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता ठाणे पोलिसांनी केतकीला ताब्यात घेतले आहे.