कोल्हापूर विमानतळावर नाईट लँडिंग सुविधेचा प्रत्यक्ष वापर सुरु; ‘हे’ मंत्री ठरले पहिले प्रवासी

बहुप्रतिक्षित असलेल्या कोल्हापूर विमानतळावर प्रत्यक्ष नाईट लँडिंग सुविधेचा वापर सुरू झाला आहे. ही सुविधा विमानतळ विकासाच्या प्रक्रियेतील मैलाचा टप्पा ठरला आहे. ३ नोव्हेंबरपासून नाईट लँडिंग सुविधा कार्यरत विमानतळावर कार्यरत झाली, मात्र प्रत्यक्ष वापर रविवारी रात्री प्रथमच करण्यात आला. तर उद्योगमंत्री उदय सामंत पहिले प्रवासी ठरले आहे. उदय सामंत यांच्या खासगी विमानाने सुरक्षित टेक ऑफ केल्याने कोल्हापूर विमानतळ २४x७ सेवेत असण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

(हेही वाचा – जानेवारीपासून बोंबलायचंय म्हणून सध्या घशाला आराम देतोय, राज ठाकरेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण)

रविवारी रात्री ८ वाजून ४६ मिनिटांनी या विमानतळावरून पहिल्यांदा खासगी विमानाचे टेक ऑफ झाले. तर उद्योगमंत्री उदय सामंत आणि त्यांचे कुटुंबीय तिरूपतीला या विमानाने रवाना झाले. ३ तारखेपासून नाईट लँडिंग सुविधा सुरू झाली असली तरी कोणत्याही एअरलाईन्सने अथवा खासगी विमान वापरकर्त्यांनी परवानगी मागितली नव्हती. मंत्री उदय सामंत यांनी तिरुपतीला जाण्यासाठी रविवारी विमानाचे नाईट टेक ऑफ करणार असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाला शनिवारी दिली होती. त्यानंतर त्यांच्या विमानाने तिरुपतीसाठी टेक ऑफ केले.

दरम्यान, पहिल्यांदाच सेवा देण्यात येणार असल्याने सुरक्षित तपासणी करण्यात आली होती. याविमानाने प्रवास करणारे पहिले प्रवासी उदय सामंत ठरले असून त्यांनी यावेळी असे सांगितले की, कोल्हापूरमधील नाईट लँडिंग सुविधेमुळे येथील विमानाची विमानसेवेची गती वाढणार आहे. ही सुविधा उपलब्ध झाल्यानंतर त्याचा सुरूवात करण्याची संधी मला मिळाली हे माझे भाग्य आहे, उद्योजक व्यावसायिक आणि विविध कंपन्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here