Adani Gas Share Price : सेबीच्या हिंडेनबर्ग नोटिशीनंतर अदानी समुहाचे शेअर ४ टक्क्यांनी वाढले

139
Adani Green Energy : अदानी समुहातील ‘हा’ शेअर एका वर्षांत १०७ टक्क्यांनी वधारला
Adani Green Energy : अदानी समुहातील ‘हा’ शेअर एका वर्षांत १०७ टक्क्यांनी वधारला
  • ऋजुता लुकतुके

ज्या हिंडेनबर्ग अहवालाने जानेवारी २०२२ मध्ये अदानी समुहाची अपरिमित हानी केली, त्याच हिंडेनबर्ग कंपनीवर भारतीय शेअर बाजार नियामक संस्था अर्थात सेबीने गेल्या आठवड्यात ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. या नोटिशीनंतर अदानी समुहाचे सातही शेअर या आठवड्यात साधारण ४ टक्क्यांच्या तेजीत होते. अदानी एंटरप्रायझेस या फ्लॅगशिप कंपनीचा शेअरही ३,१०० अंशांची पातळी ओलांडून वर गेला आहे. (Adani Gas Share Price)

तर अदानी टोटल गॅस कंपनीचा शेअरही ८८८ वरून सोमवारी थेट ९२६ वर गेला होता. शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी अदानी टोटल गॅसचा शेअर ८९३.५० अंशांवर स्थिरावला आहे. गुरुवारच्या तुलनेत शेअरच्या किमतीत २.९५ अंशांची घट झाली.

(हेही वाचा – महाराष्ट्रात Congress कडे मुख्यमंत्री पदासाठी १० इच्छूक; महाविकास आघाडीत वाढणार डोकेदुखी)

जानेवारी २०२२ च्या हिंडेनबर्ग अहवालानंतर अदानी समुहाच्या शेअर बाजारात नोंदणी असलेल्या ७ कंपन्यांच्या शेअरमध्ये मिळून १५० अब्ज अमेरिकन डॉलरचं नुकसान झालं होतं. जगातील आणि भारतातील श्रीमंतांच्या यादीतही गौतम अदानी (Gautam Adani) यांची पिछेहाट झाली. (Adani Gas Share Price)

सोमवारी अदानी टोटल गॅसच्या किमतीत (Adani Gas Share Price) आलेल्या उसळीमुळे कंपनीचं बाजार मूल्य १ लाख कोटी रुपयांच्या घरात गेलं आहे. ब्रोकरेज फर्म्स इन्व्हेस्टेक आणि जेफरीज यांनी अदानी विल्मर, अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी टोटल गॅस यांचा अभ्यास पुन्हा एकदा सुरू केला असून इन्व्हेस्टेक कंपनीने अदानी टोटल गॅसला बाय कॉल दिला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.