अतिरिक्त वीज मिळणार पण….; लोडशेडिंगची समस्या सुटणार की नाही? वाचा सविस्तर

राज्यात भारनियमन होणार असल्याचा इशारा राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिला होता. अदानीकडून वीज पुरवठा कमी झाल्यामुळे लोडशेडिंग करण्याची परिस्थिती आली असल्याचे नितीन राऊत यांनी म्हटले होते. यानंतर महानिर्मिती आणि अदानी या दोन्ही वीज निर्मिती कंपन्यांनी महावितरणला अधिकची वीज उपलब्ध करून देण्यासंदर्भात ग्वाही देण्यात आली आहे. असे असले तरी देखील मागणी पुरवठ्यातील फरकामुळे भविष्यातही महाराष्ट्राला लोडशेडिंगच्या समस्येला सामोरे जावे लागणार असल्याचे सांगितले जात आहे.

वीज संकटात नागरिकांना दिलासा मिळणार

मिळालेल्या माहितीनुसार, महावितरणला महानिर्मितीकडून साधारण ६,८०० मेगावॅटपर्यंत वीज मिळत होती ती आता ७,५०० मेगावॅटपर्यंत मिळणार आहे. अदानी पॉवर कंपनीकडून १,७०० मेगावॅटवरून २,२५० मेगावॅट वीजपुरवठा उपलब्ध होत आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासून ३,०११ मेगावॅट वीज उपलब्ध होणार आहे. उपलब्धतेनुसार मागणी व पुरवठा यातील तूटी कमी झाल्यास भारनियम टप्प्या-टप्प्याने कमी करता येईल, या परिणामी वीज संकटात नागरिकांना दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

(हेही वाचा – राणा दाम्पत्यांना नोटीस, मग शिवसैनिकांना का नाही? )

महानिर्मिती, अदानीने महावितरणला देणार अधिकची वीज 

गुरूवारी आणि शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऊर्जा विभागाचा आढावा घेतला होता. खासगी वीज कंपन्यांना अतिरिक्त वीज निर्मिती करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. तसेच करार केल्यानुसार कंपन्या वीज पुरवठा करत नसतील तर अशा कंपन्यांना करारभंगाची नोटीस देण्यात येईल, असे ऊर्जा मंत्र्यांनी सांगितले आहे. विजेचे भारनियमन कमीत कमी करुन वीजग्राहकांना दिलासा देण्यासाठी महानिर्मिती आणि अदानीने महावितरणला अधिकची वीज उपलब्ध करुन देण्याची ग्वाही देण्यात आली आहे.

असा वाढला वीज पुरवठा

  • अदानीकडून १ हजार ७०० मेगावॉटवरून ३ हजार ११ मेगावॉट वीज पुरवठा
  • महानिर्मिती ६ हजार ८०० मेगावॉटवरून ७ हजार ५०० मेगावॉटपर्यंत वीज उपलब्ध करणार

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here