Adani Wilmar Share Price : अदानी विल्मर कंपनी ओंकार केमिकल्सचा ६७ % हिस्सा खरेदी करणार 

Adani Wilmar Share Price : या व्यवहाराचं मूल्य ५६ कोटी रुपये इतकं आहे 

169
Adani Wilmar Share Price : अदानी विल्मर कंपनी ओंकार केमिकल्सचा ६७ % हिस्सा खरेदी करणार 
Adani Wilmar Share Price : अदानी विल्मर कंपनी ओंकार केमिकल्सचा ६७ % हिस्सा खरेदी करणार 
  • ऋजुता लुकतुके 

अदानी उद्योग समुहातील खाद्यतेल कंपनी (Adani Wilmar Share Price) अदानी विल्मरने ओंकार केमिकल्स कंपनीतील ६७ टक्के हिस्सेदारी विकत घेतली आहे. दोन्ही कंपन्यांदरम्यान यासाठी आवश्यक कागदोपत्री व्यवहार झाले असून ओंकार केमिकल्समधील या हिस्सेदारीचं मूल्य ५६ कोटी रुपये इतकं असल्याची अदानी विल्मर कंपनीने शेअर बाजारात लेखी कळवलं आहे.

अदानी आणि सिंगापूरचा विल्मर उद्योग समुह यांच्या भागिदारीने उभी राहिलेली ही कंपनी देशातील प्रमुख ग्राहकोपयोगी वस्तू बनवणारी कंपनी आहे. खाद्यतेल, कणीक, डाळी, बेसन आणि साखर यासारख्या वस्तू ही कंपनी सध्या वितरित करते. ओंकार केमिकल्सच्या शेअर हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू झाली असली तरी त्यासाठी ३ ते ४ महिने वेळ अपेक्षित आहे. (Adani Wilmar Share Price)

(हेही वाचा- Bhusawal Nandurbar Passenger वर तब्बल अर्धा तास दगडफेक!)

ओंकार केमिकल्स ही कंपनी साबण, शाई, डिंक यामध्ये वापरण्यात येणारा सरफॅक्टन्ट हा रासायनिक घटक बनवते. आणि अदानी विल्मर कंपनीला आपल्या ग्राहकोपयोगी वस्तूंसाठी या घटकाची गरज पडते. आतापर्यंत हा घटक ते बाहेरून विकत घेत होते. पण, ओंकार केमिकल्सच्या हिस्सेदारीनंतर त्यांना सरफॅक्टंटचा पुरवठा नियमितपणे सुरू होईल. (Adani Wilmar Share Price)

Adani wilmar

ही बातमी उघड झाल्यावर अदानी विल्मर कंपनीचा शेअरला मुंबई शेअर बाजारात शुक्रवारी चांगली मागणी होती. आठवड्याच्या शेवटी हा शेअर अर्ध्या टक्क्याच्या वाढीसह ३३६ अंशांवर बंद झाला. ओंकार केमिकल्समधील गुंतवणुकीनंतर अदानी विल्मर कंपनीला ग्राहकोपयोगी वस्तूंच्या उत्पादनात विस्ताराला मोठी मदत होणार आहे. (Adani Wilmar Share Price)

(हेही वाचा- IAS Pooja Khedkar यांच्या आईच्या अडचणी वाढणार? आईविरोधात ‘त्या’ प्रकरणात गुन्हा दाखल)

सध्या अदानी समुह विल्मर या आपल्या सिंगापूरमधील भागिदार कंपनीकडून काही रासायनिक घटक भारतात आयात करतो. हे परावलंबन आता कमी होईल. आणि कंपनीच्या शेअरवरही याचा परिणाम येत्या दिवसांम्ये दिसू शकेल. (Adani Wilmar Share Price)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.