राज्यातील विविध भागांत दिवाळीनिमित्त एसटीच्या 800 हून अधिक गाड्या सोडण्याचे नियोजन पुणे विभागाने केले आहे. प्रवाशांसाठी ऑनलाइन बुकिंग सुरू झाले असल्याची माहिती वाहतूक व्यवस्थापक ज्ञानेश्वर रणावरे यांनी दिली.
800 हून अधिक बस चालविल्या जाणार
राज्यातील विविध भागांतून नागरिक कामानिमित्त पुणे आणि परिसरात स्थायिक झाले आहेत. तसेच पुणे हे विद्येचे माहेर घर असल्यामुळे शिक्षणासाठी देखील मोठ्या प्रमाणात विद्यार्थी पुण्यात येतात. पण, दिवाळीला शाळा आणि विद्यालयांना सुट्टी असल्याने नागरिक गावी जातात किंवा पर्यंटनासाठी जाण्याचे नियोजन करतात. यासाठी एसटीच्या पुणे विभागाने विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील स्वारगेट, पुणे स्टेशन आणि शिवाजीनगर स्थानकातून 19 ते 23 ऑक्टोबर दरम्यान एसटीच्या 800 हून अधिक बस चालविल्या जाणार आहेत.
(हेही वाचा – मोदींकडून शिंदे गटाला दसरा गिफ्ट; केंद्रात दिली मोठी जबाबदारी)
विशेषतः मराठवाडा आणि विदर्भात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता या भागात जास्तीच्या गाड्या सोडण्यात येणार आहे. मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश येथे जाणाऱ्या बस खडकी कॅंटोन्मेट बोर्ड येथून बस सोडण्यात येणार आहे. नागरिकांनी एसटी महामंडळाच्या संकेतस्थळाचा वापर करून बुकिंग करावे, असे आवाहन एसटी विभागाने केले आहे.
Join Our WhatsApp Community