सोलापुरातील आदित्य कोडमूरने ‘कार्ड थ्रो’या खेळात विक्रम रचला आहे आणि त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. सोलापुरातील १७ वर्षीय आदित्यने ‘कार्ड थ्रो’ म्हणजेच पत्ते अचूकपणे फेकण्याच्या प्रकारात अमेरिकेचा रेकॉर्ड मोडला आहे. अमेरिकेचा थ्रोअर स्ट्रीचर याने २५ कार्ड अचूकपणे थ्रो करून गिनीज बुकमध्ये आपल्या नावाची नोंद केली होती. आदित्यने स्ट्रिचपेक्षा ९२ कार्ड जास्त म्हणजे ११७ कार्ड थ्रो करून गिनीज बुक वर्ल्डमध्ये स्वतःचे नाव कोरले आहे.
( हेही वाचा: कर्नाटकात भीषण अपघात, लॉरी-बसच्या धडकेत 7 ठार, 26 जखमी )
आदित्य कोडमूरचे सर्व स्तरावरुन कौतुक
मागच्या ७ वर्षांपासून आदित्य हा वेगवेगळे जादूचे प्रकार करून दाखवतो, मात्र आपण यापेक्षा काहीतरी वेगळं कराव या उद्देशाने त्याने थ्रो कार्डचा सराव सुरु केला आणि त्यात त्याला यश आलं. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड बुकचा त्याला ऑफिशियल मेल आला असून, सोलापुरात त्याचं सर्वत्र कौतुक केलं जातं आहे.
Join Our WhatsApp Community