चंद्रयान-3 मोहिमेच्या यशानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था येत्या २ सप्टेंबर रोजी (ADITYA L 1) आदित्य-एल1 मिशन लाँच करणार आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून याचे प्रक्षेपण होणार आहे. अहमदाबाद येथील इस्रोच्या स्पेस ऍप्लिकेशन सेंटरचे संचालक नीलेश देसाई यांनी ही माहिती दिली.
यासंदर्भात देसाई यांनी सांगितले की, हे यान (ADITYA L 1) लाँचिंगसाठी तयार असून १२७ दिवसांत १.५ दशलक्ष किलोमीटरचा प्रवास पूर्ण करणार आहे. हे हॅलो ऑर्बिटमध्ये तैनात केले जाईल. जिथे एल1 पॉईंटअसतो. हा बिंदू सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये स्थित आहे. पण सूर्यापासून पृथ्वीच्या अंतराच्या तुलनेत ते फक्त १ टक्के आहे. हे मिशन पीएसएलव्ही रॉकेटमधून प्रक्षेपित केले जाईल. आदित्य-एल1 (ADITYA L 1) मोहीम सतीश धवन अंतराळ केंद्रात आहे. येथे ते आता रॉकेटमध्ये स्थापित केले जाईल. लोक आदित्य-एल1 ला सूर्ययान असे देखील म्हणत आहेत.
(हेही वाचा – ‘चंद्रयान’च्या यशानंतर आता ISRO लॉन्च करणार भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे स्पेस मिशन)
आदित्य-एल1 ही भारताची पहिली सौर मोहीम आहे. या मोहिमेशी संबंधित सर्वात महत्त्वाचा पेलोड म्हणजे व्हिजिबल लाइन एमिशन कोरोनाग्राफ (व्हीईएलसी) हा पेलोड इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्सने बनवला आहे. सूर्ययानला ७ पेलोड आहेत. त्यापैकी सहा पेलोड इस्रो आणि इतर संस्थांनी बनवले आहेत.
आदित्य-एल-1 (ADITYA L 1) अंतराळयान पृथ्वी आणि सूर्यादरम्यानच्या एल-1 कक्षेत ठेवण्यात येणार आहे. म्हणजेच, सूर्य आणि पृथ्वी प्रणालीमधील पहिला लॅग्रॅन्जियन बिंदू. याच ठिकाणी आदित्य-एल1 तैनात असेल. Lagrangian पॉइंट खरेतर अंतराळातील पार्किंग आहे. जिथे अनेक उपग्रह तैनात करण्यात आले आहेत. व्हीईएलसी पेलोडचे मुख्य अन्वेषक राघवेंद्र प्रसाद यांनी सांगितले की, भारताचे सूर्ययान पृथ्वीपासून सुमारे 15 लाख किमी अंतरावर या ठिकाणी तैनात असेल. या ठिकाणाहून ते सूर्याचा अभ्यास करणार आहे. ते सूर्याजवळ जाणार नाही. सूर्ययानमध्ये स्थापित व्हीईएलसी सूर्याचा एचडी फोटो घेईल. पीएसएलव्ही रॉकेटमधून हे यान (ADITYA L 1) प्रक्षेपित करण्यात येणार आहे. या पेलोडमध्ये लावलेला वैज्ञानिक कॅमेरा सूर्याची उच्च रिझोल्यूशनची छायाचित्रे घेईल. यासोबतच स्पेक्ट्रोस्कोपी आणि पोलरीमेट्रीही केली जाणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community