Aditya L1 : आदित्यने पृथ्वीभोवती प्रदक्षिणा पूर्ण करत केला नव्या कक्षेत प्रवेश

99
Aditya L1 : आदित्यने पृथ्वीभोवती प्रदक्षिणा पूर्ण करत केला नव्या कक्षेत प्रवेश

इस्रोने शनिवार २ सप्टेंबर रोजी आदित्य एल १ या (Aditya L1) यानाचे यशस्वी प्रक्षेपण केले. सतीश धवन अवकाश केंद्रातून पीएसएलव्ही रॉकेटच्या साहाय्याने भारताचे आदित्य (Aditya L1) यान सूर्याच्या दिशेने झेपावले. सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी या यानाचे प्रक्षेपण करण्यात आले. हे प्रक्षेपण पाहण्यासाठी सतीश धवन अवकाश केंद्रात लोकांची बरीच गर्दी जमली होती. इस्रोच्या (ISRO) या मोहिमेमुळे आता भारताला सूर्याचा अभ्यास करणं सहज शक्य होणार आहे.

अशातच आता भारताच्या सूर्यायानाने म्हणजेच आदित्य एल१ (Aditya L1) ने सूर्य मोहिमेच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. पृथ्वीभोवतीची प्रदक्षिणा पूर्ण करुन या यानाने नव्या ऑर्बिटमध्ये प्रवेश केला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच, इस्रोने (ISRO) याबाबत माहिती दिली आहे. इस्रोने ट्वीट करत म्हटलं आहे की, आदित्य एल१ या यानाचं दुसरं अर्थ बाऊंड मॅन्यू पूर्ण केलं आहे. याचाच अर्थ या यानाने सूर्याभोवतीची दुसरी प्रदक्षिणा देखील पूर्ण केली आहे.

इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, आदित्य-एल1 (Aditya L1) ने मंगळवार ५ सप्टेंबर रोजी पहाटे २ वाजून ४५ मिनिटांनी पृथ्वीच्या नव्या कक्षेत प्रवेश केला. पृथ्वीची ही कक्षा २८२ किमी X ४०,२२५ किमी इतकी आहे. पृथ्वीपासून या कक्षाचे किमान अंतर २८२ किमी आहे. तर कमाल अंतर ४०,२२५ किमी असल्याचं इस्रोकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, आदित्य एल1 १० सप्टेंबर रोज भारतीय वेळेनुसार, सकाळी २:३० वाजता पृथ्वीच्या नव्या कक्षेत प्रवेश करणार असल्याचं इस्रोकडून सांगण्यात आलं आहे.

(हेही वाचा – Political Parties Financial Report : देशातील 8 पक्षांच्या संपत्तीत वर्षभरात 1531 कोटींची वाढ)

‘या’ पाच टप्प्यांमध्ये पूर्ण होणार प्रवास

हे आदित्य (Aditya L1) यान पाच टप्प्यांमध्ये सूर्याचा प्रवास करणार आहे. पीएसएसव्ही रॉकेटच्या माध्यमातून हे यान पृथ्वीच्या खालच्या कक्षेत प्रस्थापित करण्यात येणार आहे. त्यानंतर हे यान पृथ्वीच्या कक्षेतच फिरणार आहे. दुसऱ्या टप्प्यात हे यान पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर काढण्यात येईल. तिसऱ्या टप्प्यात या यानाचा सूर्याच्या दिशेने प्रवास सुरु होईल. चौथ्या टप्प्यात हे यान लॅग्रेंज बिंदूच्या कक्षेत प्रस्थापित करण्यात येईल. पाचव्या टप्प्यात हे यान सूर्याचा अभ्यास करण्यास सुरुवात करेल. या संपूर्ण प्रक्रियेस जवळपास चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे. पण पुढील पाच वर्षांसाठी हे यान सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोला मदत करणार आहे.

या सौरमोहिमेद्वारे (Aditya L1) सूर्याचे तापमान, अतिनील किरणांचा पृथ्वीवर होणारा परिणाम, ओझोनचा थर, अंतराळातील हवामान, सौरवादळे आणि त्याचा पृथ्वीवर होणारा परिणाम या सर्व गोष्टींचा अभ्यास करण्यात येणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.