चंद्रावर यशस्वी लँडिंग केल्यानंतर आता भारताने सूर्याच्या दिशेने पाऊल टाकलं आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) आदित्य-एल १ यशस्वीरित्या लाँच केलं आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून पीएसएलव्ही-सी५७ रॉकेटद्वारे आदित्य-एल१ चं लाँचिंग झालं आहे.आदित्य एल१ (Aditya L1)ची पृथ्वी भोवतालची कक्षा रविवारी (३ सप्टेंबर) आणखी वाढवली जाणार असल्याचे इस्रो ने ट्विट करत संगितले आहे.
‘आदित्य एल१’ चा प्रवास १२५ दिवसांचा असणार आहे. आदित्य एल१ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर तासभरातच इस्रोने नवी माहिती दिली आहे. रविवारी ११ वाजून ४५ मिनिटांनी यानाची कक्षा आणखी वाढवली जाणार आहे. सध्या आदित्य एल१ हे यान पृथ्वी भोवती २३५ बाय १९,५०० किलोमीटर अशा लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत आहे. उद्या आणखी वरच्या कक्षेत म्हणजेच पृथ्वीपासून आणखी जास्त अंतरावरुन हे यान पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालायला सुरुवात करेल. यासाठी यानावर असलेली इंजिनांचे काही मिनिटे प्रज्वलन केले जाणार आहे.
Aditya-L1 started generating the power.
The solar panels are deployed.The first EarthBound firing to raise the orbit is scheduled for September 3, 2023, around 11:45 Hrs. IST pic.twitter.com/AObqoCUE8I
— ISRO (@isro) September 2, 2023
(हेही वाचा : Hindu Heritage Month : अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यात ‘ऑक्टोबर महिना ‘हिंदू वारसा महिना’ म्हणून घोषित; काय आहे विशेष कारण)
ही माहिती देतांनाच यानाच्या प्रक्षेपणाचे काही फोटो देखील ISRO ने प्रसिद्ध केले आहेत. सूर्याचा शोध घेणाऱ्या ‘आदित्य एल१’ या अंतराळ मोहिमेतून एका नव्या संशोधनपर्वाचा झाला आहे आणि त्यावर आपल्या भारत देशाची मोहोर उमटणार आहे. आदित्य एल वन या यानासोबतची उपकरणे अवकाशातील सौरवादळे व त्यांच्या अवकाशातील हवामानावर होणाऱ्या परिणामांचाही अभ्यास करणार आहेत. या मोहिमेमुळे, सूर्याचा वेध घेणाऱ्या देशांच्या मालिकेत भारताचे नाव मोठ्या सन्मानाने समाविष्ट होईल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community