विधानसभा, लोकसभा निवडणुका एकत्र झाल्या तर प्रशासन सज्ज; मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती

देशासह राज्यात निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. त्यासोबतच लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याचा विचार सुरु आहे. निवडणूक आयोगाने तसे सांगितल्यास आमची तयारी असल्याचे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे म्हणाले.

देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यासंदर्भात चर्चा सुरु आहे. या निवडणुका एकत्र घेण्यास आयोग सज्ज आहे का असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. याला राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशापांडे याला उत्तर दिले असून दोन्ही निवडणुका एकत्र घेण्यास प्रशासन सज्ज असल्याची माहिती त्यांनी दिली. देशपांडे निवडणुकीच्या पूर्वी तयारीचा आढावा घेण्यासाठी भंडा-यामध्ये आले असता त्यांनी वरील माहिती दिली.

( हेही वाचा: ‘जाणता राजा’च्या व्यासपीठावर एकत्र आले छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर सावरकरांचे वंशज  )

32 लाखांपेक्षा अधिक मतदारांचे यादीतील फोटो सारखेच

आगामी निवडमुकीच्या अनुषंगाने मतदार याद्या अद्ययावर करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. यात धक्कादायक माहिती समोर आली असून, मतदार यादीतील तब्बल 32 लाखांपेक्षा अधिक मतदारांचे यादीतील फोटो सारखेच आहे. त्यामुळे यात बनावट कुठले हे पडताळणी करण्याची प्रक्रिया सुरु असून बनावट मतदारांना यादीतून वगळण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशापांडे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here