Shree Tuljabhavani Mandir संस्थानची प्रशासनिक गतिमानता वाढणार

93
Shree Tuljabhavani Mandir संस्थानची प्रशासनिक गतिमानता वाढणार
Shree Tuljabhavani Mandir संस्थानची प्रशासनिक गतिमानता वाढणार

श्री तुळजाभवानी देवींचे मंदिर (Shree Tuljabhavani Mandir) हे संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. गेल्या कित्येक वर्षापासून काही मोजक्याच कर्मचाऱ्यांवर मंदीर संस्थानचे कामकाज चालत होते. हे कर्मचारी राज्यासह परराज्यातील भाविकांना देखील सेवा देत होते. त्यामुळे मंदिर संस्थान प्रशासनावर कामाचा प्रचंड ताण येत होता. मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे (Dr. Sachin Ombase) यांनी पुढाकार घेऊन हा ताण कमी करण्यासाठी नोकर भरती प्रक्रिया राबविली. या भरती प्रक्रियेमुळे आता मंदिर प्रशासनाचा कामाचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

(हेही वाचा – कानपूरपाठोपाठ Rajasthan मध्येही रेल्वे अपघात घडवण्याचा प्रयत्न, रेल्वे रूळांवर सापडला सिमेंटचा ठोकळा)

मंदिर संस्थानच्या वतीने राबविण्यात आलेल्या नोकर भरती प्रक्रियेतील 30 उमेदवारांना जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे (Dr. Sachin Ombase) यांच्या हस्ते श्री तुळजाभवानी मंदिर (Shree Tuljabhavani Mandir) प्रशासकीय इमारतीतील सभागृहात आयोजित कार्यक्रमात नियुक्तीपत्र देण्यात आले आहेत. यामुळे श्री तुळजाभवानी मंदिर (Shree Tuljabhavani Mandir)) संस्थानची प्रशासनिक गतिमानता वाढण्यास मदत होणार आहे. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानात जवळपास 33 वर्षांनी सरळ सेवेने ही नोकर भरती करण्यात येत आहे. श्री तुळजाभवानी मंदिर (Shree Tuljabhavani Mandir) संस्थानच्या वतीने मार्च माहिन्यापासून भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

(हेही वाचा – मुंबई विमानतळावर Amit Shah जाता जाता अजित पवारांनी घेतली भेट)

या भरती प्रक्रियेत सहायक व्यवस्थापक (धार्मिक), मिडिया प्रमुख, मंदिर सुरक्षा अधिकारी, जनसंपर्क अधिकारी, सहाय्यक जनसंपर्क अधिकारी, सॉफ्टवेअर इंजिनिअर, हार्डवेअर इंजिनिअर, वायरमन, मिस्त्री, स्वच्छता निरीक्षक, सुरक्षा निरीक्षक, नेटवर्क इंजिनिअर, अभिरक्षक यासह अनेक पदांचा समावेश आहे. राज्यभरातील विविध जिल्ह्यातील उमेदवारांची यापदासाठी नियुक्ती करण्यात आली. तुळजाभवानी मंदिर संस्थानने 48 पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरुवातीला राबविली होती. त्यानंतर श्री तुळजाभवानी मंदिरातील कर्मचाऱ्यांची गरज ओळखून काही जागांचा समाविष्ट करून 62 पदांना मंजुरी देण्यात आली. त्यातील काही पदांच्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.