Ranjit Savarkar : देवाला अर्पण केलेल्या अशुद्ध प्रसादाचे फळ विपरीतच !

150
Ranjit Savarkar : देवाला अर्पण केलेल्या अशुद्ध प्रसादाचे फळ विपरीतच !
Ranjit Savarkar : देवाला अर्पण केलेल्या अशुद्ध प्रसादाचे फळ विपरीतच !

देवाला अर्पण केलेला प्रसाद अशुद्ध असेल, तर त्याचे फळ विपरीतच मिळेल. त्यामुळे अनुकूल फळासाठी देवाला वाहिलेला प्रसाद हा नेहमी शुद्ध असावा, असे मत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकचे कार्याध्यक्ष आणि ओम् प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष रणजित सावरकर (Ranjit Savarkar) यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

सध्या हिंदूंच्या मंदिराबाहेर मोठ्या संख्येने प्रसाद विक्रेत्यांची दुकाने असतात. त्यातील अनेक जण अन्य धर्मीय असतात. त्यांच्याकडून प्रसादाच्या निर्मितीमध्ये भेसळ केली जाते. अनेकदा त्यामध्ये गायीच्या चरबी वापरून बनवलेल्या भेसळयुक्त तुपाचा वापर केला जातो, अशा घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे यासाठी आता समस्त हिंदुत्ववादी संघटना ‘ओम प्रतिष्ठान’च्या छत्राखाली एकवटल्या आहेत. ही भेसळ रोखण्यासाठी आणि हिंदूंच्या मंदिरातील प्रसादाचे पावित्र्य आणि सात्त्विकता टिकवून ठेवण्यासाठी ‘ओम् प्रमाणपत्र’ (OM Certificate) ही संकल्पना मांडण्यात आली आहे. त्यासाठी हिंदुत्ववादी संघटना नाशिकमध्ये संघटित झाल्या आहेत. आज शुक्रवारी, १४ जूनला नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील काही मिठाई विक्रेत्यांना ओम् प्रमाणपत्र वितरीत करून या चळवळीला सुरुवात झाली.

(हेही वाचा – Kashid Beach Resort: तुम्ही फिरण्याचा प्लन करत आहात? मग काशिद बीच बद्दल अवश्य समजून जाणून घ्या  )

यावेळी रणजित सावरकर (Ranjit Savarkar ) यांच्यासह, महंत आचार्य पीठाधिश्वर डॉ. अनिकेत शास्त्री महाराज, ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे तसेच हिंदू जनजागृती संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

पेढ्यांमध्ये गाईच्या चरबीचा वापर
रणजित सावरकर यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आल्यानंतर माध्यमांशी बोलताना यामागची आपली भूमिका त्यांनी स्पष्ट केली. ”त्र्यंबकेश्वरमध्ये भेसळयुक्त पेढ्यांचे वाटप झाले, अशी बातमी ऐकली. अमरावतीला गाईची चरबी आणि खवा वापरून पेढे तयार केले आणि त्याची १००-१०० ग्रॅमची पाकिटे बनवून मंदिरात जात होते. हे प्रकार थांबवण्यासाठी महंत अनिकेत शास्त्री यांच्याशी चर्चा करून काही उपाय करायचे ठरवले आणि या ‘ओम् प्रमाणपत्रा’च्या संकल्पनेला नाशिक क्षेत्रातील १३ प्रमुख हिंदू धार्मिक संघटनांनी समर्थन आणि आशीर्वाद दिला तसेच त्यांनी काही मार्गदर्शक तत्त्वेही घालून दिली आहेत”, अशी माहिती सावरकर यांनी दिली.

मोहीम देशभरात राबवणार
‘ओम प्रमाणपत्र’ हे प्रसाद शुद्धतेची हमी असेल. या प्रमाणपत्राची सक्ती कुठल्याही विक्रेत्यावर करण्यात आली नसून ते ऐच्छिक असेल. या ‘ओम् प्रमाणपत्र’मोहिमेची सुरुवात त्र्यंबकेश्वर येथून झाली. ही मोहीम राज्यात आणि नंतर देशभरातील सर्व मंदिरांमध्ये राबवण्यात येईल, असे सांगण्यात आले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.