सिल्व्हर ओक हल्ला प्रकरण: सदावर्तेंना दिलासा, जामीन मंजूर

मुंबई उच्च न्यायालयाने एसटी संपावर दिलेल्या निर्णयानंतरही संपकरी एसटी कर्मचारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर शुक्रवारी 8 एप्रिल रोजी धडकले. गेल्या पाच महिन्यांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन सुरू असून 22 एप्रिल रोजी राज्यातील कर्मचारी कामावर रूजू झालेत. दरम्यान, शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावरील हल्ल्याप्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना 50 हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच या प्रकरणातील एकूण 115 जणांनांदेखील जामीन मंजूर करण्यात आला आहे. या प्रकरणी जामीन मिळावा यासाठी सदावर्तेंनी सत्र न्यायालयाची दारं ठोठावली होती.

(हेही वाचा – एसटीच्या 48 हजार कर्मचाऱ्यांकडून घेतले पैसे; न्यायालयात सदावर्तेंची कबुली)

सदावर्ते दाम्पत्याचा अकोल्यातील अकोट सत्र न्यायालयानेही अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. असे असले तरी मराठा समाजासंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने समाजाच्या भावना दुखावल्याच्या आरोप असल्याने सदावर्ते सध्या कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात आहेत. मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करुन समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप सदावर्तेंवर आहे. या प्रकरणी विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here