लव्ह जिहाद : आफताबचे आणखी चार तरुणींशी होते संबंध?

धर्मांध आणि विकृत मनोवृत्तीचा तरुण आफताब या मुसलमान मुलाने हिंदू युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि त्यानंतर दिल्लीत नेवून तिच्या शरीराचे ३५ तुकडे करून तिची निर्घृण हत्या केली. यामुळे संपूर्ण देशभरात खळबळ उडाली आहे. पोलीस आफताबची कसून चौकशी करत आहेत. या प्रकरणात लव्ह जिहादची किनार असल्याचा संशय पोलिसांना आहे. कारण या आधी  आफताबचे ४ हिंदू मुलींशी प्रेमाचे संबंध होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. आता त्या मुली जिवंत आहे की त्यांचाही खून केला आहे, याची चौकशी पोलीस करू लागले आहेत.

आफताब नवनवीन मुलींना घेऊन यायचा 

कारण ज्या आफताबने हिंदू मुलीची हत्या केली, त्याआधी आफताबचे आणखी ४ हिंदू मुलींशी प्रेम संबंध होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलीस आता त्या चार मुली कुठे आहेत, त्या जिवंत आहेत का, याची माहिती काढत आहेत. दिल्लीत आफताबने ज्या खोलीत हिंदू युवतीची हत्या करून तिचे ३५ तुकडे फ्रिजमध्ये ठेवले होते, त्याच खोलीत दुसऱ्या खोलीत आफताब हा दुसऱ्या एका हिंदू युवतीसोबत राहायचा, अशीही धक्कादायक माहिती समोर आली. आफताबने दुसऱ्या एका तरुणीला घरी डेटसाठी बोलावले होते. त्यावेळी त्याच घरातील फ्रिजमध्ये श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे होते. श्रद्धाच्या मृत्यूनंतर आफताब एका डेटिंग अॅपद्वारे दुसऱ्या एका तरुणीच्या संपर्कात आला होता. त्यामुळे आफताब किती क्रूर होता, याचा प्रत्येय आला आहे. दिल्लीतील मेहरौली भागात या हिंदू तरुणीचा आफताबने गळा दाबून हत्या केली होती. त्या युवतीने आफताबकडे लग्नासाठी तगादा लावल्याने त्याने तिची हत्या केली. या प्रकरणात आफताब सध्या गजाआड आहे. आफताब दिल्लीत ज्या ठिकाणी राहत होता, त्याच्या शेजारच्या लोकांनी सांगितले की, आफताब हा कायम नवनवीन मुलींना घरी घेऊन यायचा. त्यामुळे आता पोलीस या दृष्टीने चौकशी करू लागले आहेत.

(हेही वाचा शरद पवार म्हणतात, सावरकरांप्रति अंतःकरणामध्ये निश्चितपणे आदराच्या भावना आहेत!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here