काबुलमधील क्रिकेट मैदानात स्फोट, अनेक जण जखमी

अफगाणिस्तानमधील काबूल येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानात स्फोट झाला आहे. या घटनेत अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. हा स्फोट का करण्यात आला? यामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. जखमींना उपचाराकरता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोट झाला त्यावेळी क्रिकेट मैदानात शेपेझीस क्रिकेट स्पर्धा सुरू होती. अचानक झालेल्या स्फोटामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेत क्रिकेट कर्मचारी किंवा परदेशी व्यक्तींना कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही.

( हेही वाचा: राज्यपालांचे वक्तव्य अतिशयोक्ती; भाजप ‘त्या’ विधानाशी सहमत नाही, फडणवीसांचे स्पष्टीकरण )

 

ही घटना बंद-ए- अमिर ड्रॅगन्स आणि पामिर झल्मी या संघामध्ये सामना सुरु असताना घडली. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने 2013 साली ही स्पर्धा सुरु केली होती. या स्पर्धेदरम्यान ही घटना घडली आहे. तालिबान राजवटीला विरोध करणा-या इस्लामिक स्टेटने केलेल्या बाॅम्ब हल्ल्यांच्या मालिकेचा फटका अफगणिस्तानला बसला आहे. काबूल येथे दोन दिवसांपूर्वीच गुरुद्वारा कर्ते परवान येथे अशाचप्रकारे बाॅम्बब्लास्ट झाला होता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here