Shraddha Murder Case: आफताबची ‘या’ दिवशी होणार नार्को टेस्ट, दिल्ली पोलिसांना कोर्टाची परवानगी

श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब पूनावालाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सोमवारी 28 नोव्हेंबर रोजी दिल्लीतील एफएसएल कार्यालयाबाहेर आणत असताना त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तेव्हापासून तिहार तुरुंग प्रशासन अलर्ट मोडवर आहे. आफताबच्या पॉलिग्राफी चाचणीचा आणखी एक टप्पा आज मंगळवारी होत आहे. यासाठी कारागृहातून एफएसएल कार्यालयात आणताना कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. यापूर्वी चार वेळा ही चाचणी झाली असून आफताबच्या पॉलिग्राफी चाचणीची ही पाचवी फेरी आहे. पोलिसांनी आफताबला अनेक महत्त्वाचे प्रश्न विचारले आहेत. सर्व काही सुरळीत राहिल्यास 5 डिसेंबर रोजी त्याची नार्को चाचणीही होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात होती.

‘या’ दिवशी होणार नार्को टेस्ट

दरम्यान, दिल्लीच्या साकेत न्यायालयाने आफताबच्या नार्को चाचणीची तारीख निश्चित केली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार दिल्ली पोलीस 1 डिसेंबर रोजी आफताबची नार्को टेस्ट करणार आहेत. यासंदर्भात दिल्ली पोलिसांनी नुकतीच परवानगी मागितली होती. दिल्लीच्या साकेत न्यायालयाने श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताबची 1 आणि 5 डिसेंबर रोजी नार्को चाचणी आणि पॉलिग्राफी चाचणी करण्यास परवानगी दिली आहे. दिल्ली पोलिसांच्या अर्जावर मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट अविरल शुक्ला यांनी हा आदेश दिला.

(हेही वाचा – PM Rojgar Mela 2022: देशातील तब्बल १० लाख युवकांना मिळणार जॉब; कसा, कुठे करायचा अर्ज? वाचा सविस्तर)

26 नोव्हेंबर रोजी न्यायालयाने आफताबला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. 21 नोव्हेंबर रोजी साकेत न्यायालयाने आरोपी आफताबची पॉलिग्राफी चाचणी करण्यास परवानगी दिली होती. त्याआधी साकेत न्यायालयाने आफताबची नार्को टेस्ट करण्याचे आदेश दिले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here