छत्रपती संभाजीनगरनंतर आता पुण्यात ईडीची छापेमारी; बिल्डर्स आणि काॅन्ट्रॅक्टरर्सची चौकशी

233

छत्रपती संभाजीनगर येथे छापेमारी केल्यानंतर ईडीने आता पुण्यातदेखील छापेमारी सुरु केली आहे. पुण्यात काही बिल्डर्स आणि काॅन्ट्रॅक्टर्सवर ईडीने छापे मारले आहेत.

केंद्र सरकारच्या महत्वकांक्षी अशा पंतप्रधान आवास योजनेत गैरव्यवहार झाल्याची माहिती पुढे आल्यानंतर संभाजीनगरमध्ये छापेमारी करण्यात आली. त्यानंतर आता पुण्यातही छापेमारी केली जात असल्याने बिल्डर्स-काॅन्ट्रॅक्टरचे धाबे दणाणले आहेत.

( हेही वाचा: ई- रिक्षा पुन्हा सुरु करण्यासाठी माथेरानकरांनी पुकारला बंद )

पंतप्रधान आवास योजनेत समरथ मल्टीविज इंडिया, पुणे येथील सिद्धार्थ प्राॅपर्टीज, नवनिर्माण कन्स्ट्रक्शन यासह चार कंपन्यांनी निविदा भरली होती. 40 हजार घरांसाठी 4 हजार कोटींचा हा घरकुलाचा प्रकल्प उभारला जाणार होता. त्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाकडून पडेगाव, तीसगाव, हर्सल, सुंदरवाडी, चिकलठाणा या ठिकाणची 128 हेक्टर जमीन उपलब्ध करुन देण्यात आली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.