अलर्ट! जगभरात धुमाकूळ घालतोय ‘हा’ नवा संसर्ग

65

जगभरात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. गेल्या दीड वर्षांपासून कोरोनानं हैराण झाल्यानंतर आता जगभरात एक नवा संसर्ग फैलावत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, एकामागून एक असे व्हायरस देशाच्या काना-कोपऱ्यात पोहोचत आहे. कोरोना सारख्या व्हायरसमुळे अशी परिस्थिती उद्भवली की, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सारखा पर्याय लागू करावा लागला. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत असला तरी अचानक मंकीपॉक्सचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.

(हेही वाचा – पडळकरांच्या जिवाला धोका नाही! मंत्री अनिल परब यांची भूमिका)

अमेरिकेत मंकी व्हायरसच्या प्रकरणाची पुष्टी

जगभरात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. गेल्या दीड वर्षांपासून कोरोनानं हैराण झाल्यानंतर आता जगभरात एक नवा संसर्ग फैलावत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, एकामागून एक असे व्हायरस देशाच्या काना-कोपऱ्यात पोहोचत आहे. कोरोना सारख्या व्हायरसमुळे अशी परिस्थिती उद्भवली की, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सारखा पर्याय लागू करावा लागला. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत असला तरी अचानक मंकीपॉक्सचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेत मंकी व्हायरसच्या प्रकरणाची पुष्टी करण्यात आली आहे. हा व्हायरस आफ्रिकेतून आला आहे. नायजेरियातून आलेल्या एका अमेरिकन व्यक्तीमध्ये या व्हायरसचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. यानंतर मंकी व्हायरस पसरण्याचा धोका वाढला आहे. यूएस सेंटर्स फॉर डिसीज प्रिव्हेंशन आणि मेरीलँड डिपार्टमेंट ऑफ हेल्थ यांनी एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात असे म्हटले की, या ठिकाणी असणाऱ्या रुग्णांमध्ये मंकी व्हायरसची सौम्य लक्षणे दिसली आहेत.

जाणून घ्या काय आहे मंकीपॉक्स

मंकीपॉक्स हा स्मॉलपॉक्सचा एक प्रकार असून फक्त त्याची लक्षणे सौम्य असतात. या मध्येही शरीरातील स्मॉलपॉक्स सारखे पुरळ बाहेर येतात. तसेच हा व्हायरस एकापासून दुसऱ्यामध्ये खूप वेगानं पसरतो. ते त्वचेपासून त्वचेवर पसरते. याशिवाय ते कपड्यांपर्यंतही पसरते. त्यामुळे बाधित व्यक्तीच्या शरीरावर पुरळ उठते, असे सांगितले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.