मुलांना ‘हे’ कफ सिरप देताय? भारतीय बनावटीच्या सिरपमुळे तब्बल 66 बालकांचा मृत्यू

163

जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO ने भारतात तयार केल्या जाणाऱ्या कफ सिरपवरून एक महत्त्वाची सावधगिरी बाळगण्यासाठी अलर्ट जारी केली आहे. कफ सिरपमध्ये असलेल्या काही घटकांचे प्रमाण हे मुलांसाठी घातक असल्याचे समोर आले आहे. भारतातील मेडेन फार्मास्युटुकल लिमिटेड या कंपनीकडून बनवण्यात आलेल्या सर्दी-खोकला आणि तापावरील सिरपवरून हा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

(हेही वाचा – ‘या’ देशात आता भारतीयांना व्हिजाशिवाय प्रवेश; मुंबईत वाणिज्य दूतावास सुरु करण्याबाबत विचार)

भारतीय कंपन्यांनी बनवलेल्या सर्दी खोकल्याच्या ४ औषधांविषयी अलर्ट दिला आहे. या औषधांनी गांबियातील ६६ मुलांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने हा हा अलर्ट जारी केला असून असे सांगितले की, या औषधांचे सेवन जीवघेणे आहे. या फार्मास्यूटिकल कंपनी भारतात हरियाणामध्ये आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गांबिया नावाच्या देशात ६६ लहान मुलांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. या मुलांच्या मृत्यूचे कारण त्यांच्या कीडनीत झालेला बिघाड झाला असल्याचे दिसून आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे सर्दी-खोकला किंवा ताप आल्यानंतर लहान मुलांना एक सिरप देण्यात आले होते. यातील सिरपमध्ये असणारे काही घटक लहान मुलांच्या शरीरासाठी घातक होते. या कफ सिरपमुळे या बालकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. गांबियात तब्बल ६६ मुलांचा मृत्यू झाल्यावर WHO ने ही औषध वापरण्यात बंदी घातली आहे.

हे सिरप तुम्ही देताय, सावधान

  • प्रोमेथायझीन ओरल सोल्यूशन (Promethazine Oral Solution)
  • कॉफेक्समेलिन बेबी कफ सिरप (Kofexmalin Baby Cough Syrup)
  • मकॉफ बेबी कफ सिरप (Makoff Baby Cough Syrup)
  • मॅग्रीम एन कॉल्ड सिपर (Magrip N Cold Syrup)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.