फूड डिलिव्हरीनंतर Amazon आता देशात ‘ही’ सेवा बंद करणार!

117

जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी Amazon बाबत एक मोठी आहे. अॅमेझॉन कंपनीने भारतातील वितरण सेवा (Amazon Distribution Services) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. फूड डिलिव्हरी आणि ई-लर्निंग प्लॅटफॉर्म बंद केल्यानंतर कंपनीने हा निर्णय घेतला आहे. कंपनीला आपल्या मूळ व्यवसायावर लक्ष केंद्रित करायचे असल्याने हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत कंपनी आपल्या उर्वरित सेवा बंद करत आहे. जागतिक मंदीचा आगामी काळात संपूर्ण जगावर वाईट परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत कंपनी आपला मुख्य व्यवसाय चांगल्या प्रकारे हाताळू शकते, म्हणून कंपनीकडून उर्वरित व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

(हेही वाचा – पुरुषांनो सावधान! तुम्ही महिलांकडे एकटक तर बघत नाही ना? नाहीतर…)

अहवालानुसार, अॅमेझॉनची वितरण सुविधा प्रामुख्याने बेंगळुरू, हुबळी आणि म्हैसूर सारख्या शहरांमध्ये होती. कंपनीच्या या सेवेत 50 कर्मचारी काम करत होते. कंपनी तिच्या वितरण सुविधेद्वारे कंपनीकडून किरकोळ व्यापाऱ्यांना वस्तूंचा पुरवठा करत होती. वितरणाची सेवा बंद करण्याबाबत कंपनीने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

अलीकडच्या काळात जगभरातील मोठ्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे मंदीची भीती कंपन्यांना सतावत आहे. अॅमेझॉननेही आपल्या अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. यासोबतच कंपनीने नुकतेच फूड डिलिव्हरी आणि ई-लर्निंग प्लॅटफॉर्म बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अॅमेझॉनने भारतातील FMCG क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली होती, पण त्याचा फारसा फायदा झाला नाही. कंपनीवर रिलायन्स इंडस्ट्रीज, वॉलमार्ट, फ्लिपकार्ट आणि टाटा ग्रुपसारख्या कंपन्यांचा दबदबा आहे. अॅमेझॉनला FMCG क्षेत्रात फारसा नफा मिळाला नाही, त्यामुळे कंपनीने भारतात हा व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.