ना OTP शेअर, ना कोणत्या लिंकवर क्लिक, तरीही बँक अकाऊंट रिकामं…काय आहे प्रकार?

168

सध्या सोशल मीडियाचा वापर वाढल्याने अनेक सायबर गुन्हे होताना दिसताय. अशातच अनेक स्कॅम देखील सर्वसामान्यांचं जगणं मुश्कील करताना दिसताय. जमतारा हा फिशिंगचा स्कॅम वेब सीरीजमुळे सर्वांना ज्ञात आहेच. पण त्यापेक्षाही मोठा स्कॅम सध्या मुंबईत सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मुंबईकरांनो सावधान… मुंबईत एटीएम वापरणाऱ्यांना या स्कॅमचा फटका बसतोय.

(हेही वाचा – कापसाच्या शेतात केली गांजाची लागवड, तीन शेतकऱ्यांवर गुन्हा अन्…)

दरम्यान, बँकांना सलग सुट्ट्या लागणाच्या बरोबर आधीच एटीएम कार्ड क्लोन करून बँक अकाऊंट रिकामं करण्याचा धंदा काही लुटारूंकडून सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार सात जणांची टोळी यामध्ये सक्रिय असून याप्रकरणी एका खासगी बँकेने अंधेरी पोलिसात तक्रारही दाखल केली आहे. या तक्रारीनंतर तब्बल ६ लाख रूपये लंपास केल्याचे समोर आले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

एका खासगी बँकेच्या दोन एटीएममधून तब्बल ६ लाख ४० हजार रूपयांचे बोगस ट्रान्झॅक्शन करण्यात आल्यानंतर अंधेरी पूर्वेच्या एमआयडीसी पोलीस स्थानकाच याची बँकेने तक्रार दिली. सध्या याप्रकरणाचा तपास सुरू आहे. यापूर्वीही अनेकदा लोकांच्या बँक अकाऊंटमधून अनेकदा पैसे एटीएम कार्ड क्लोन करून लंपास केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहे. त्यामुळे कार्ड क्लोन करणारी टोळी देशभरात पसरत चालली असून या गँगला ताब्यात घेण्यासाठी मुंबई पोलिसांसमोर मोठं आव्हान उभे राहिले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.