ट्विटर-फेसबुकनंतर आता ‘या’ कंपनीतील 10 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार!

92

ट्विटर-फेसबुक कंपनीमधील मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकल्यानंतर आता अॅमेझॉनमधील 10 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार आहे. समोर आलेल्या एका अहवालानुसार, ई कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी अॅमेझॉन या आठवड्याच्या सुरुवातीला कॉर्पोरेट आणि टेक्नॉलॉजी क्षेत्रातील साधारण 10 हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची योजना आखत आहे.

(हेही वाचा – Amazon धर्मांतरासाठी निधी पुरवते! RSS शी संलग्न असलेल्या मासिकाचा दावा)

या अहवालानुसार, ज्या विभागांमध्ये नोकऱ्यांमध्ये कपात केली जाणार आहे. त्यामध्ये अॅमेझॉनची डिव्हाईस युनिट (ज्यामध्ये वॉईस असिस्टंट ॲलेक्सा) अॅमेझॉनची उपकरण संस्था, रिटेल डिव्हिजन आणि ह्युमन रिसोर्समधील नोकऱ्यांवर प्रामुख्याने टांगती तलवार असणार आहे. अॅमेझॉनवर एकूण 10 हजारच्या आसपास कर्मचाऱ्यांची कपात होण्याची शक्यता आहे. तर अॅमेझॉनच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कर्मचारी कपात असणार आहे.

अॅमेझॉन जगभरात 1.6 दशलक्षाहून अधिक लोकांना रोजगार देते. गेल्या वर्षी 31 डिसेंबरपर्यंत अॅमेझॉनमध्ये 1.6 दशलक्ष पूर्णवेळ आणि अर्धवेळ काम करणारे कर्मचारी होते. पुढील काही महिन्यांसाठी नोकरभरती थांबवणार असल्याचेही कंपनीने यापूर्वी सांगितले होते. ट्विटरचे नवीन मालक एलॉन मस्क यांनी सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांना कंपनीतून काढून टाकले. याशिवाय फेसबुकवरूनही कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले. मेटाने 11 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. यानंतर झुकेरबर्गने याबाबत कंपनीची गरज असून हा निर्णय घ्यावा लागला असल्याचे म्हणत या कर्मचाऱ्यांनी माफी मागितली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.