मेटा, ट्विटर, गुगल सारख्या दिग्गज कंपन्यांनंतर आता ‘या’ कंपनीचा मोठा निर्णय, 6 हजार कर्मचारी करणार कमी

127

जगभरात मंदीचे सावट येण्यास सुरूवात झाली आहे. मेटा, ट्विटर, अॅमेझॉन, गुगल या मोठ्या कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली आहे. यानंतर आता दिग्गज कंपनी Hp Inc ने देखील कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे देशात अनेक कंपन्यांमध्ये नव्या नोकरभरतीच्या जाहीराती निघत असताना दूसरीकडे कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला जात आहे.

(हेही वाचा – Google layoff: अॅमेझॉन, मेटानंतर ‘या’ कंपनीकडून १० हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार)

संगणक आणि प्रिंटर निर्माता कंपनी HP Inc ने मंगळवारी अशी माहिती दिली की, ही कंपनी येत्या 3 वर्षात 4000 ते 6000 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची योजना आखत आहे. जगातील प्रसिद्ध तंत्रज्ञान कंपनी Hewlett-Packard म्हणजेच HP कंपनी येत्या काही वर्षांत 6 हजार नोकऱ्या काढून टाकण्याची योजना आखत आहे. तर पर्सनल कॉम्प्युटरची घटती मागणी आणि सातत्याने कमी होत असलेला महसूल याचा विचार करता एचपी कंपनी पुढील तीन वर्षांत 6,000 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा आणणार असल्याचा निर्णय घेत आहे.

कंपनीचे सीईओ एनरिक लॉरेस यांनी सांगितल्यानुसार, एचपी आपल्या रिअल इस्टेट फूटप्रिंट कमी करणार आहे. खर्च नियंत्रित करण्यासाठी पुढील तीन वर्षांत कंपनीच्या 61,000 जागतिक कर्मचाऱ्यांपैकी 10 टक्के कपात करण्यात येणार आहे. तर आर्थिक वर्ष 2025 च्या अखेरीस वार्षिक 1.4 अब्ज डॉलर वाचवण्याची योजना असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.