मुंबईनंतर आता ठाण्यात धावणार इलेक्ट्रिक बस, TMC कडून 123 ई-बसेसची ऑर्डर

देशात सध्या इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी लक्षात घेता लोकांचीही त्याला पसंती मिळत आहे. अनेक राज्यात सार्वजनिक वाहतूकीत इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश करण्यात येत आहे. मुंबई महापालिकेनंतर आता ठाणे महापालिकेने ऑलेक्ट्रा कंपनीला इलेक्ट्रिक बसेसची ऑर्डर दिली आहे. ऑलेक्ट्राला ठाणे महापालिकेकडून १८५ कोटी रूपयांचे कंत्राट देण्यात आले आहे.

(हेही वाचा – केवळ वेदांता-फॉक्सकॉन नव्हे; मागील १० वर्षांत इतके प्रकल्प गेले महाराष्ट्राबाहेर)

ठाणे महापालिकेने ऑलेक्ट्रा कंपनीला १२३ ई-बसेसची ऑर्डर दिली आहे. या बसेस ९ महिन्यांत डिलिव्हरी केल्या जातील, या बसेसमध्ये ४५ वातानुकूलित आणि १० साध्या बसेस आहेत. आणखी ६८ ई बसपैकी २६ वातानुकूलित ४२ साध्या बसेस आहेत. तर लिथिअम आयन बॅटरी असलेल्या या बस चार तासात पूर्ण चार्ज होऊ शकतात, असे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्य प्रदूषणमुक्त करण्यासाठी सरकारसाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांवर भर देत आहे. ऑलेक्ट्रा कंपनी महाराष्ट्रावर अधिक लक्ष केंद्रित करत आहे. तर Olectra Greentech Limited आणि Eway Trans Private Limited च्या कंसोर्टियमला ​​ठाणे महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडून ही ऑर्डर देण्यात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here