दिलासादायक बातमी! मुंबईनंतर ‘या’ जिल्ह्यातही कोरोना नियंत्रणात

108

मुंबई खालोखाल आव्हानात्मक ठरलेल्या पुणे जिल्ह्यातील कोरोना संख्या आता ब-यापैकी नियंत्रणात आली आहे. पुण्यात आता केवळ १ हजार ५६२ कोरोनाचे रुग्ण उरलेत. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या पुण्यात अडीच हजारांच्याही पुढे होती. राज्यातही आता केवळ ४ हजार ४७६ कोरोना रुग्ण उरल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

पुण्यात २०६ ओमायक्रॉन रुग्णांची नोंद

शुक्रवारच्या नोंदीत पुण्यात २०६ ओमायक्रॉन रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी १४६ ओमायक्रॉनचे रुग्ण बीजे मेडिकल महाविद्यालय तर ६० रुग्ण राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेकडून झालेल्या जनुकीय चाचणीतून समोर आले. राज्यात पुण्याखालोखाल मुंबईत आता ६००, अहमदनगरला ४६९, ठाण्यात ३८८, नाशकात २९०, सिंधुदुर्गात १३६, रायगडात १७७ आणि नागपूरात १९५ रुग्णांवर आता उपचार सुरु आहेत. राज्यातील उर्वरित जिल्ह्यांत आता दोन आकडी रुग्ण संख्या उरली आहे.

(हेही वाचा – 100व्या कसोटीत कोहलीची ‘विराट’ कामगिरी! ‘इतक्या’ धावांचा गाठला पल्ला)

राज्यभरात केवळ ५२५ नव्या रुग्णांची नोंद

दरम्यान राज्यात आता २८ हजार ८७८ माणसे गृह विलगीकरणात आहेत तर ५१५ संस्थात्मक विलगीकरणात आहेत. शुक्रवारी राज्यभरात केवळ ५२५ नव्या रुग्णांची नोंद झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. तर ९९२ रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला. तर ९ रुग्णांनी आपला जीव गमावला.

  • राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण – ९८.०७ टक्के
  • राज्यातील मृत्यूदर – १.८२ टक्के
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.