१३० हेक्टर जागेत शोधले जात आहे ‘त्या’ धडाचे मुंडके!

सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील मिर्चीचे घाऊक व्यापारी दादा जगदाळे याची हत्या करण्यात आली होती.

112

१३० हेक्टरपेक्षा अधिक जागेत असलेल्या मुंबईच्या पूर्व उपनगरातील गोवंडी येथील ‘डम्पिंग ग्राउंड’ मध्ये सोलापूरमधील मिर्ची व्यापाऱ्याचे मुंडके शोधण्यासाठी गुन्हे शाखेची यंत्रणा मागील काही दिवसांपासून कामाला लागली आहे. मात्र एवढ्या मोठ्या डम्पिंग ग्राउंडवर कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून मुंडके शोधणे पोलिसांसाठी अवघड होऊन बसले आहे.

मृतदेहाचे अवयव वेगळे करून टाकले

सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील मिर्चीचे घाऊक व्यापारी दादा जगदाळे याची हत्या करण्यात आली होती. ही हत्या लहणपणाची मैत्रीण मोनालीचा पोलिस पती शिवशंकर गायकवाड याने २९ सप्टेंबर रोजी केली होती. ही हत्या मुंबई वरळीतील पोलिस वसाहत येथे राहत्या घरात करण्यात आली होती. दादा जगदाळे याची हत्या करून हातपाय मुंडके धडापासून वेगळे करण्यात आले होते व रात्रीच्या वेळी धड आणि हात अँटॉप हिल सेक्टर ७ येथील एसीपी कार्यालय असलेल्या इमारतीच्या मागे फेकण्यात आले होते. मुंडके मानखुर्द येथील एका कचरा कुंडीत टाकल्याची कबुली अटक करण्यात आलेल्या पोलिस वाहन चालक शिवशंकर गायकवाड याने मुंबई गुन्हे शाखा कक्ष ४ च्या पथकाला दिली होती.

(हेही वाचा : नवाब भाईंना ‘तो’ अधिकार दिला कुणी? चित्रा वाघ यांचा सवाल)

ठराविक कालावधीपर्यंत ही शोध मोहीम करणार

गुन्हे शाखेने गायकवाड याला अटक केल्यानंतर त्याने दिलेल्या कबुलीनंतर गुन्हे शाखेच्या पथकाने मुंडके शोधण्यासाठी मानखुर्द येथील कचराकुंड्यामध्ये शोध घेतला, मात्र या कचरा कुंड्यातील सर्व कचरा गोवंडी येथील शिवाजी नगर या ठिकाणी १३० हेक्टरमध्ये पसरलेल्या डम्पिंग ग्राउंड या ठिकाणी टाकला जातो. १९ ऑक्टोबरपासून गुन्हे शाखेचे पथक जेसीबी आणि पालिकेचे कर्मचारी तसेच डम्पिंग ग्राउंडवर कचरा वेचक महिला पुरुषांच्या मदतीने दादा जगदाळे याच्या धडाचे मुंडक्याचा शोध घेण्यात येत असून अद्याप हे मुंडके मिळालेले नाही. १३० हेक्टर मध्ये पसरलेल्या डम्पिंग ग्राउंडवर मुंडके शोधणे म्हणजे गवताच्या गंजीत सुई शोधण्यासारखे असल्याचे गुन्हे शाखा कक्ष ४चे प्रभारी पोलिस निरीक्षक इंद्रजित मोरे यांनी म्हणाले तसेच ही शोध मोहीम ठरलेल्या कालावधीपर्यंत करण्यात येईल, दरम्यान दादा जगदाळेचे मिळालेल्या इतर अवयवाचे डीएनए तपासून मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात येईल, अशी माहिती मोरे यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.