आता सर्वसामान्यांचा ब्रेकफास्ट महागणार! ब्रेडच्या दरात पुन्हा वाढ

पेट्रोल-डिझेल, गॅस सारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीनंतर आता ब्रेडच्या दरातही वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. स्लाईस ब्रेडच्या दरात पुन्हा वाढ झाली असून त्याचे २ ते ५ रूपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांचा नाश्ताही महागणार असल्याचे सांगितले जात आहे. स्लाईस ब्रेडचे दर वाढल्याने परिणामी सँडविचच्या किंमतीतही वाढ होऊ शकते.

(हेही वाचा – …त्यामुळे उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा, नारायण राणेंची मागणी)

गेल्या पाच महिन्यात ब्रेडच्या दरात दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने यावर्षी खुल्या बाजारात गव्हासाठी विक्री योजना जाहीर न केल्याने मे महिन्यापासूनच ही दर वाढ होणं अपेक्षित होतं, आणि या अपेक्षेनुसारच ब्रेडची किंमत वाढली आहे. दरम्यान, इंधन दरवाढीमुळे सर्वच वस्तू महाग होत आहेत. त्यामुळे वाढत्या इंधनाच्या किंमती देखील ब्रेडच्या दरवाढीला कारणीभूत ठरली आहे.

किती होणार दरवाढ

मिळालेल्या माहितीनुसार, ब्रेडच्या नव्या दरवाढीनुसार, ४०० ग्रॅम पांढऱ्या ब्रेडची किंमत ३३ रूपयांवरून ३५ रूपये करण्यात आली आहे. तर ब्राऊन ब्रेडची किंमत ४५ रूपयांवरून ५० रूपये झाली आहे. आणि सँडविचसाठी वापरल्या जाणाऱ्या ब्रेडची किंमत ६५ वरून ७० रूपयांवर पोहोचली आहे. या सर्व ब्रेड्सचा वापर सर्वसामान्य नागरिकांपासून सर्वच करतात त्यामुळे आता सगळ्यांचाच नाश्ता महाग होणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here