ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ दुस-या यांचे वयाच्या 96व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाबाबत संपूर्ण जगभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. आता ब्रिटनमध्ये राजेशाही ही पूर्वापार चालत आली आहे. त्यामुळे ब्रिटनची राष्ट्रीय प्रतिके,राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वज यांवरही राजेशाही पद्धतीचा ठसा उमटलेला दिसतो. पण राणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर गेल्या 70 वर्षांपेक्षा जास्त काळ ब्रिटनमध्ये चालत आलेल्या या गोष्टींमध्ये बदल होणार असल्याचे सांगण्यात येत आहे
ध्वज आणि प्रतिकांमध्ये होऊ शकतात बदल
ब्रिटनमध्ये संरक्षक दले त्याचप्रमाणे नौदलाच्या जहाजांवर, शासकीय कार्यालयांवर फडकणा-या ध्वजावर EIIR हे रॉयल सायफर किंवा राणीची आद्याक्षरे लिहिलेली असतात. त्याचप्रमाणे राष्ट्रकूल संघाचे सदस्य असलेल्या देशांमध्येही राणीच्या भेटीदरम्यान E Flag फडकवला जातो. पण यामध्ये आता बदल होण्याची शक्यता आहे. ब्रिटनच्या सध्याच्या राष्ट्रध्वजामध्ये अर्धाभाग इंग्लंडचा तर उर्वरित भागामध्ये स्कॉटलंड आणि आयर्लंडचे प्रतिनिधीत्व करणारे प्रतिक दर्शवण्यात आले आहे. पण नवीन राजा या ध्वजामध्ये कदाचित वेल्सचाही समावेश करू शकतो, असे म्हटले जात आहे.
राष्ट्रगीतात बदल
मुख्य म्हणजे ब्रिटनच्या राष्ट्रगीतात आमूलाग्र बदल घडून येऊ शकतात. सध्या ब्रिटनच्या राष्ट्रगीतात God save our gracious Queen असे शब्द असून ते बदलून आता God save our gracious King असे केले जाईल. मुळात 1745 पासून सुरू असलेल्या या राष्ट्रगीतामध्ये झालेला हा बदल ब्रिटनमधील सामान्य जनतेकडून लगेच स्वीकारण्यात येईल का, हे पाहणे महत्वाचे आहे.
चलन बदल
दैनंदिन जीवनात ब्रिटनमध्ये वापरात येणा-या चलनावर राणीचं चित्र आहे. सध्या ब्रिटनमध्ये 4.5 अब्ज इतक्या नोटा चलनात आहेत. त्यामुळे यावरील राणीचे चित्र बदलायचे ठरवले तर ही प्रक्रिया वर्षानुवर्षे चालेल. ब्रिटनमध्ये चलनी नोटांवर राणीचं चित्र छापण्यास 1960 पासून सुरुवात झाली आहे. तसेच काही नाण्यांवरही राणीची छबी उमटवण्यात आली आहे.
पोस्टाची तिकीटे बदलणार
रॉयल मेल पोस्ट बॉक्सेसवर ER ही राणी एलिझाबेथची आद्याक्षरे आहेत. ही आद्याक्षरे तशीच राहणार असून पोस्टाच्या तिकिटांवर मात्र आता राणीऐवजी नव्या राजाची म्हणजेच किंग चार्ल्स याची छायाचित्रे छापण्यात येतील, असे ब्रिटनमधील प्रसारमाध्यमांचे म्हणणे आहे.
Join Our WhatsApp Community