ट्वीटरचा ताबा मिळताच, एलाॅन मस्क यांनी सीईओंना दाखवला बाहेरचा रस्ता

153

टेस्लाचे सीईओ एलाॅन मस्क यांनी नुकताच ट्वीटरचा ताबा घेतला आहे. यानंतर त्यांनी कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह अनेक उच्चपदस्थांना कंपनीच्या बाहेरचा रस्ता दाखवला आहे. राॅयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, ट्वीटरचे सीईओ पराग अग्रवाल, विजया गड्डे, मुख्य वित्तीय अधिकारी नेड सेहगल आणि इतर काही वरिष्ठ अधिका-यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. नेड सेहगल आणि पराग अग्रवाल हे दोघेही सॅन फ्रान्सिस्कोच्या मुख्यालयात उपस्थित होते. त्यावेळी त्यांना ट्वीटरमधून बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

( हेही वाचा: सदस्य नोंदणीसाठी शिंदे गटाची भन्नाट आयडिया; स्वयंचलित कॉलिंग यंत्रणा, फोन करताच मुख्यमंत्र्यांचा आवाज )

मस्क यांचे ट्वीट

गुरुवारी एलाॅन मस्क यांनी ट्वीट करत ट्वीटर विकत घेण्याच्या उद्देशाबाबत माहिती दिली होती. भविष्यातील नागरिकांसाठी एक डिजिटल मंच असणे आवश्यक आहे. त्यामुळेच मी ट्वीटर खरेदी केले आहे. याठिकाणी विविध विचारसरणीचे लोक हिंसा टाळून वादविवाद करु शकतील. सध्या समाजमाध्यमे अतिउजवे आणि अतिडावे यात विभागली जाण्याची भीती आहे. त्यामुळे तिरस्कार आणि समाजातील दरी वाढत जाईल, अशा आशयाचे ट्वीट मस्क यांनी केले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.