गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेला ओम राऊत यांचा आदिपुरुष हा चित्रपट अखेर १६ जून रोजी प्रदर्शित झाला. मात्र या चित्रपटावर प्रचंड टीका होत आहे. अनेकांनी या चित्रपटावर नाराजी व्यक्त केली आहे. तर सोशल मीडियावरून अनेकांनी निर्माते, दिग्दर्शक आणि लेखक यांच्यावर सडकून टीका केली आहे.
या टिकेमागील मुख्य कारण म्हणजे चित्रपटातील थिल्लर संवाद, रामायणाचे विडंबन, गरजेपेक्षा अधिक VFX चा वापर.
आदिपुरुष हा चित्रपट पाहिल्यानंतर रामायण कसं दाखवू नये याचं उत्तम उदाहरण सादर केल्याची टीका अनेकांनी सोशल मीडियावरून केली आहे. आदिपुरुषमधील काही संवाद प्रेक्षकांना खटकले असून त्यावरून सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे.
(हेही वाचा – जम्मू-काश्मीर : सैन्याने नष्ट केली स्फोटके)
चित्रपटातील थिल्लर संवाद
१. चित्रपटातील एका सीनमध्ये रावणाचा मुलगा इंद्रजीत हा बजरंग बलीच्या शेपटीला आग लावतो. त्यावेळी तो म्हणतो, “जली ना? अब और जलेगी.. बेचारा जिसकी जलती है, वही जानता है”
इंद्रजीतच्या या डायलॉगवर बजरंग बली म्हणतो, “कपडा तेरे बाप का, आग तेरे बाप की, तेल तेरे बाप का, जलेगी भी तेरे बाप की”
२. अशोक वाटिकेत जेव्हा बजरंग बली सीतेला भेटण्यासाठी येतो, तेव्हा रावणाचा एक राक्षस त्याला पाहून म्हणतो, “तेरी बुआ का बगीचा है क्या, जो हवा खाने आ गया”
३. या चित्रपटात बजरंग बलीच्या तोंडी असलेला आणखी एक डायलॉग म्हणजे, “जो हमारी बहनों को हाथ लगाएंगे, उनकी लंका लगा देंगे”
४. युद्धादरम्यान लक्ष्मणावर जेव्हा इंद्रजीत वार करतो, तेव्हा म्हणतो, “मेरे एक सपोले ने तुम्हारे इस शेष नाग को लंबा कर दिया. अभी तो पूरा पिटारा भरा पड़ा है”
५. अशोक वाटिकेत सीतेची भेट घेतल्यानंतर जेव्हा बजरंग बली श्रीरामाकडे परततो, तेव्हा ते सीतेविषयी विचारतात. “जानकी कैसी है”, असा प्रश्न विचारल्यावर बजरंग बली म्हणतो, “जीवित है”
चित्रपटातील संवाद बदलणार
सोशल मीडियावरील प्रचंड ट्रोलिंगनंतर अखेर या चित्रपटाच्या निर्माते आणि दिग्दर्शकांनी मोठा निर्णय घेतला आहे. या चित्रपटातील वादग्रस्त डायलॉग्स आता बदलण्यात येणार आहे. टी-सीरिजच्या अधिकृत प्रवक्त्याने याबाबतची माहिती दिली असून संवादलेखक मनोज मुंतशीर यांनीदेखील ट्विट करत संवाद बदलणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. ‘मी आणि चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शकांनी ठरवलंय की जे संवाद तुम्हाला खटकले आहेत, त्याविषयी आम्ही अभ्यास करू आणि या आठवड्यात सुधारित संवाद चित्रपटात समाविष्ट करू’, असं त्यांनी सांगितलं आहे.
रामकथा से पहला पाठ जो कोई सीख सकता है, वो है हर भावना का सम्मान करना.
सही या ग़लत, समय के अनुसार बदल जाता है, भावना रह जाती है.
आदिपुरुष में 4000 से भी ज़्यादा पंक्तियों के संवाद मैंने लिखे, 5 पंक्तियों पर कुछ भावनाएँ आहत हुईं.
उन सैकड़ों पंक्तियों में जहाँ श्री राम का यशगान…— Manoj Muntashir Shukla (@manojmuntashir) June 18, 2023
<
#Adipurush के कुछ dialogues पर आपत्ति सही।
लेकिन श्रीराम-माता सीता को गाली को comedian की अभिव्यक्ति, दूसरी फ़िल्मों में देवी देवताओं के मज़ाक़ को creativity और राम को काल्पनिक और सालों साल टेंट में रखने की साज़िश करने वालों को अचानक श्रीराम के सम्मान की चिंता पाखंड लगता है।
— Aman Chopra (@AmanChopra_) June 17, 2023
अशाप्रकारे करण्यात आले चित्रपटातून रामायणाचे विडंबन
सर्वसाधारण प्रत्येकाला रामायण माहित आहे. मात्र असं असतांनाही चित्रपटातून चुकीच्या पद्धतीने रामायण दाखवण्याचा मूर्खपणा दिग्दर्शक ओम राऊत आणि संवाद लेखक मनोज मुंतशीर यांनी केला आहे.
- रावण हा राक्षस असला तरीही तो अत्यंत हुशार होता. मात्र सिनेमातील रावण हा अतिशय ‘छपरी’ दाखवण्यात आला आहे.
- विभीषणची पत्नी अश्लील महिला म्हणून दाखवण्यात आली असून विभीषण हा आप पक्षाच्या राघव चढ्ढासारखा आहे.
- इतर अजून कोणी जखमी झाले तर आपल्याकडे संजीवनीचा साठा असावा म्हणून हनुमान संजीवनी बुटीचा पर्वत घेऊन येतो.
- चित्रपटातून सोन्याची लंका काळ्या रंगाची दाखवण्यात आली आहे.
- राजा, मंत्री, सैनिक यापैकी कोणीही चित्रपटात मुकुट घातलेले नाही, तसेच केसदेखील वेगवेगळ्या स्टाईलने कापले आहे.
- सिनेमातून रावण लोहार दाखवला आहे.
- संपूर्ण सिनेमात केवळ ७-८ कलाकार आहेत, बाकी सगळे कार्टून कॅरेक्टर आहेत.
- कहर म्हणजे सिनेमात रावण श्रीरामांसमोर सीता मातेचे हरण करतांना दाखवले आहे.
- शिव भक्त रावण रुद्राक्ष तोडतांना दिसला आहे.
- रावण अजगराच्या कातडीवर झोपतांना दाखवला आहे.
- रावण डोळ्यात सुरमा लावलेला दाखवला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community