संजय पांडे यांच्या निवृत्तीनंतर यांच्याकडे दिली जाणार मुंबई पोलीस आयुक्त पदाची जबाबदारी

98

मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे हे ३० जून रोजी निवृत्त होत आहे. पांडे यांच्या निवृत्तीसाठी अवघे काही दिवस उरलेले असताना आयुक्तपदाची तात्पुरती धुरा गृहरक्षक दलाचे पोलीस महासंचालक डॉ. भूषण उपाध्याय यांच्याकडे सोपविण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना या पक्षातील आमदारांनी मोठ्या संख्येने पक्षासोबत बंडखोरी केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अस्थिर झालेले आहे, कुठल्याही क्षणी हे सरकार कोसळण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अशा परिस्थितीत ३० जून रोजी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे हे सेवानिवृत्त होत आहे. पांडे यांच्या निवृत्तीसाठी काही दिवस उरलेले असताना नवीन आयुक्तांची साधी चर्चा देखील नसल्यामुळे पांडे हे निवृत्त झाल्यावर मुंबई पोलीस आयुक्तपद रिकामे ठेवता येणार नाही.

( हेही वाचा : कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश! १०० टक्के रिक्त पदे भरण्यास मान्यता)

प्रभारी पोलीस आयुक्त म्हणून जबाबदारी

आयुक्तपदासाठी काही ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाची चर्चा आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये होत आहे, या ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांपैकी एकाची निवड सरकारला करावी लागते. परंतु राज्यातील सरकारची अवस्था बघता ही निवड पुढे जाण्याची शक्यता आहे. मात्र मुंबईतील कायदा सुवस्थेला तडा जाऊ नये म्हणून आयुक्त पदाची तात्पुरती जवाबदारी गृहरक्षक दलाचे पोलीस महासंचालक डॉ. भूषण उपाध्याय यांच्याकडे सोपविण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजले आहे. राज्यातील एकंदरीत राजकीय वातावरण बघून मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावर प्रभारी पोलीस आयुक्त म्हणून उपाध्याय यांच्याकडे तात्पुरती जवाबदारी सोपवली जाईल अशी माहिती प्राप्त झाली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.