एलॉन मस्कला Twitter डील पडली महागात, मालक होण्याच्या नादात बुडाले इतके कोटी डॉलर

145

ट्विटर कंपनी टेकओव्हर करताच एलॉन मस्क अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. ट्विटरवर मालकी हक्क मिळताच त्यांनी सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह वरच्या स्तरावर अलेल्या अनेकांना बाहेरचा रस्ता दाखवला. दरम्यान, एलॉन मस्क यांनी केलेली ट्विटर डील त्यांचा चांगलीच महागात पडली असल्याचे सांगितले जात आहे. कारण झालेल्या सौद्यात त्यांना मोठं नुकसान सहन करावं लागलं असून मस्क यांच्या एकूण मालमत्तेला या कारणामुळे मोठा फटका बसला असल्याची माहिती ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सने दिली आहे.

(हेही वाचा – एलॉन मस्कनी ताबा घेताच डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंट सुरू होणार? ट्विटरने केला खुलासा)

ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सच्या निर्देशांकाच्या दाव्यानुसार, एलॉन मस्क यांची एकूण संपत्ती १ हजार कोटींनी घटली आहे. पण यावर कोणतेही भाष्य न करता मस्क यांनी ट्विटरच्या माध्यमातून पैसा कमवणार नसल्याचे सांगितले तर मानवतेला मदत करण्यासाठी ही डील केल्याचा दावा केला आहे. यावर्षी एप्रिलमध्ये एलॉन मस्कने ट्विटर खरेदी करण्यासाठी करार केला होता. त्याअंतर्गत मस्क यांनी ५४.२० डॉलर भावाने शेअर खरेदीचा व्यवहार पूर्ण केला. पण ६ महिन्यानंतर मस्क यांना हा सौदा चांगलाच महागात पडल्याचे समोर आले आहे.

गेल्या सहा महिन्यात अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदरात मोठी वाढ केली आहे. त्यामुळे अमेरिकेत महागाई ही मोठी समस्या बनली असून कंपन्यांना या अनिश्चित वातावरणाचा मोठा बसल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या सौद्यामुळे मस्क यांच्या नेटवर्थ संपत्तीत १००० कोटी डॉलरचा फटका बसला आहे. यावर्षी २०२२ मध्ये या अब्जाधीशाला ६६०० कोटी डॉलरचे नुकसान सहन करावे लागले आहे. त्याची जागतिक कंपनी टेस्लाचे शेअर ३५ टक्के घसरले आहे. ट्विटरवर मालकी हक्क मिळवण्यासाठी मस्क यांनी बरीच मेहनत घ्यावी लागली. ट्विटरची मालकी मिळविण्यासाठी मस्क यांनी सौदा केला पण त्यामध्ये त्यांचेच मोठे नुकसान झाले. कारण मस्क यांनी हा करार पूर्ण केला नसता तर त्यांना कोर्ट कचेरीच्या धावा कराव्या लागल्या असता, असे सांगितले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.