Uber नंतर आता Ola नेही वाढवले भाडे, ‘या’ शहरांतील प्रवास महागला!

184

देशात महागाईने नवा उच्चांक गाठला असल्याने पेट्रोल, डिझेल, सीएनजी, एलपीजी, पीएनजी अशा सर्वांचे दर गगनाला भिडले आहेत. अशातच अनेक शहरांमध्ये पेट्रोलच्या दराने 100 रुपयांची पातळी ओलांडल्याचा फटका आता कॅब आणि टॅक्सी सेवांवर दिसून येत आहे. अॅपवर आधारित टॅक्सी सेवा देणाऱ्या अमेरिकन कंपनी उबरने मुंबई आणि दिल्ली-एनसीआरनंतर कोलकाता आणि हैदराबादमध्ये त्यांचे भाडे वाढवले आहे. त्याचप्रमाणे प्रतिस्पर्धी असलेली कंपनी ओलानेही अनेक शहरांमध्ये भाडे वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नागरिकांना फटका बसणार आहे.

‘या’ शहरांतील प्रवास महागला

इंधनाच्या किमती वाढल्यामुळे चालकांचे होणारे नुकसान कमी करण्यासाठी उबरने दिल्ली-एनसीआर आणि कोलकाता येथे भाडे 12 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे मुंबई आणि हैदराबादमध्येही भाडे 15 टक्क्यांनी वाढवण्यात आले आहे, असे उबेर इंडिया आणि दक्षिण आशिया सेंट्रल ऑपरेशन्सचे प्रमुख नितीश भूषण यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले. आगामी काळात कंपनी इंधनाच्या किमतीवर लक्ष ठेवून त्यानुसार निर्णय घेणार आहे, असेही ते म्हणाले ही भाडेवाढ केवळ कारसाठी असणार आहे. तर राज्य सरकारांनी याबाबत स्वतंत्र निर्णय घेतल्याने रिक्षाच्या भाड्यात कोणताही बदल करण्यात आला नसल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे दिल्ली-एनसीआर आणि कोलकाता, मुंबई आणि हैदराबादमध्येही ओलाचा प्रवास महाग होणार आहे.

हेही वाचा – (दारू तस्करांचा भन्नाट जुगाड! LPG सिलेंडरमधून केली दारूची तस्करी)

16 टक्क्यांपर्यंत भाडे वाढ

ओलानेही मोठ्या शहरांमध्ये भाडे वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने हैदराबादमधील आपल्या चालकांना यासंदर्भात एक ईमेल पाठवून माहिती दिली आहे. ईमेलमध्ये ओलाच्या मिनी आणि प्राइम कॅटेगरीचे भाडे 16 टक्क्यांनी वाढवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. एक दिवसापूर्वीच या दोन्ही कंपन्यांचे चालक दिल्लीत संपावर गेले असतानाच या दोन्ही कंपन्यांनी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. भाडे वाढविण्याची मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.