KDMC: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सफाई कर्मचा-यांचे कामबंद आंदोलन

229

गेल्या तीन महिन्यांपासून केलेल्या कामाचा मोबदला न मिळाल्याने पालिका क्षेत्रात काम करणाऱ्या कंत्राटदाराच्या सुमारे 350 कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करत निषेध केला आहे. जोपर्यंत पगार मिळणार नाही तोपर्यंत काम बंद करण्याचा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिला आहे. मात्र कर्मचाऱ्यांच्या या इशाऱ्यानंतर कल्याण-डोंबिवली शहरात कचऱ्याचे साम्राज्य होणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कंत्राटी कामगारांनी मंगळवारपासून कामबंद आंदोलन छेडलं आहे. तीन महिन्यांपासून कंत्राटदार कंपनीने पगार न दिल्याने अखेर कामगारांनी आंदोलनाचं शस्त्र काढलंय. सेक्युर 1 या कंत्राटी कंपनीने जवळपास 350 सफाई कर्मचारी, वाहनचालकांचे वेतन थकवले आहे. त्यामुळे कामगार वर्ग मोठा आर्थिक संकटात सापडल्याचे सांगितले जात आहे. वेतन थकल्याने मुलांची शाळा, कर्ज, आजारपण या गोष्टींचा खर्च भागावायचा कसा असा प्रश्न कामगारांसमोर उभा आहे.

(हेही वाचा – भाजपा-शिवसेनेत नैसर्गिक युती व्हावी आणि झाल्यास…, सेनेच्या खासदारानं स्पष्टच सांगितलं)

भर पावसातही सफाई कर्मचारी हे काम करत असतात मात्र आमचे वेतन मिळत नसल्याने आखेर आज सकाळपासून डोंबिवलीतील खांबलपाडा परिसरात सर्व कर्मचारी नारेबाजी करत काम बंद आंदोलन करत आहे. आमच्या हक्काचे वेतन आम्हाला द्या बाकी आम्हाला पालिकेच्या कामात कोणताही अडथळा निर्माण करायचा नाही, असं देखील या कर्मचा-यांनी सांगितले आहे. जोपर्यंत वेतन मिळत नाही तोपर्यंत हे काम बंद आंदोलन सुरूच राहिल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. तर याबाबत पालिका घनकचरा अधिकारी अतुल पाटील यांनी याबाबत ठेकेदारांना विचारणा करण्यात येईल, असे सांगितले मात्र प्रत्येक वेळेस ठेकेदाराची हलगर्जीपणामुळे सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास पाहता केडीएमसी प्रशासन कंत्राटदारबाबत कोणते पाऊल उचलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.