पनवेल स्थानकाच्या नूतनीकरणासाठी प्रवासी महासंघाचे आंदोलन

165

‘प्रवासी संघ पनवेल’ या संस्थेतर्फे पनवेल एसटी स्थानकाचे रखडलेले बांधकाम तातडीने सुरू करण्यात यावे या मागणीसाठी गुरूवार, ३ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी १० वाजल्यापासून पनवेल एसटी स्थानकाकडे लाक्षणिक उपोषणाचे आयोजन करण्यात आले. या उपोषणाला शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीने पाठिंबा दर्शवला.

panvel

…तर मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग रोखणार! 

या आंदोलनात ९० वर्षांच्या व्यक्तीपासून ९ वर्षांच्या मुलापर्यंत सगळेच सामील झाले होते. यावेळी या आंदोलनाला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पाठींबा देत, ‘जर दिलेल्या वेळेत या स्थानकाचे नूतनीकरण झाले नाही, तर मोठे आंदोलन उभारण्यात येईल’, असा इशारा देण्यात आला. यावेळी एसटी स्थानकाच्या प्रशासनाने आंदोलकांचे निवेदन स्वीकारले, तर प्रवाशी महासंघाचे अध्यक्ष भक्ती कुमार दवे यांनी सरकारच्या भोंगळ कारभारावर सडकून टीका केली. १४ वर्षांपासून हे स्थानक नूतनीकरणाच्या प्रतिक्षेत असून सरकार का लक्ष देत नाही. राज्यातले सर्वात रहदारी असलेले आणि मोठे स्थानक म्हणून पनवेल स्थानक आहे. करोडो रुपयांचा महसूल इथून जमा होतो, मात्र याचे नूतनीकरण होत नाही. कोणतीही सुविधा नाही, जर याबाबत दिलेल्या वेळेत निर्णय झाला नाही. तर मुंबई-पुणे एक्स्प्रेस रोखणार आणि पुढील विधिमंडळ अधिवेशनात यावर आवाज उठवणार, असे आमदार बाळाराम पाटील म्हणाले. यावेळी शेकाप पनवेल तालुका चिटणीस राजेश गणेश केणी, पनवेल महानगरपालिका जिल्हा चिटणीस गणेश कडू, प्रवाशी महासंघाचे प्रतिनिधी महेंद्र घरत आणि प्रवासी महासंघ कार्याध्यक्ष अभिजित पाटील उपस्थित होते.

(हेही वाचा शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते माधवराव मोरे यांचे निधन)

५-६ वर्षांपासून प्रवाशांची गैरसोय होतेय 

वस्तुत: पुणे – गोवा महामार्गावरील हे अत्यंत महत्वाचे स्थानक आहे. आपला संपूर्ण रायगड जिल्हाही या स्थानकाला जोडलेला आहे. त्यामुळे हे स्थानक प्रवाशांनी सदैव गजबजलेले असते. या पार्श्वभूमीवर सर्व सोयीसुविधांनी युक्त अशा पनवेल स्थानकाचे काम युद्ध पातळीवर पूर्ण करणे गरजेचे होते. परंतु मागील ५-६ वर्षांपासून प्रवाशांची गैरसोय होत आहे. हजारो प्रवाशांना उन्हातानात आणि पावसात उभे रहावे लागत आहे. स्थानकात बसण्याची सोय नसल्यामुळे आबाल वृद्ध, महिला, विद्यार्थ्यांना तासन तास उभे राहून एसटीची प्रतिक्षा करावी लागते. ही समस्या गंभीर स्वरूपाची आहे. म्हणून या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘प्रवासी संघा’ने सनदशीर मार्गाने आंदोलन केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.