सैन्य भरतीसाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेला अनेक राज्यातून हिंसक विरोध झाला आहे. या विरोधासाठी तरुणांना चिथावणी देणारे चेहरे आता उघड होत आहेत. मध्य प्रदेशातील ग्वाहलेरमध्ये या प्रकरणात पोलिसांनी माजी सैनिकाला अटक केली आहे. मनोज असे या सैनिकाचे नाव असून तो फिजिकल ट्रेनर आहे.
एफआयआर दाखल करुन अटक
मनोजने अग्निपथ योजनेच्या विरोधात तरुणांना भडकावले आणि त्यानंतर त्यांना गोला मंदिरामध्ये एकत्र येण्याची सूचना केली होती. या आंदोलनाच्या दरम्यान मनोज तिथे उपस्थित असल्याचे पुरावे सीसीटीव्हीमध्ये सापडले आहेत. या पुराव्याच्या आधारावार त्याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आली होती. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.
( हेही वाचा: बाळासाहेबांच्या पश्चात मराठीला उतरती कळा; भाजप आमदारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र )
फिजिकल क्लब बंद ठेवण्याचे आदेश
जिल्हाधिकारी कौशलेंद्र विक्रम सिंह यांनीही या प्रकरणाची दखल घेतली असून, जिल्ह्यातील सर्व फिजिकल क्लब कोणत्याही परवानगीशिवाय सुरु न करण्याचे आदेश दिले आहेत. या क्लबला विभागीय एसडीएम कार्यालयाची परवानगी आवश्यक आहे. फिजिकल क्लबचे संचालक आणि त्यामध्ये प्रशिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांचा या आंदोलनात सहभाग असल्याची माहिती मिळाल्यानंतर हा निर्णय घेतल्याची माहिती जिल्हाधिका-यांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community