Agniveer Salary : अग्निवीरला नेमका किती पगार मिळतो? निवृत्तीनंतरची तरतूद किती?

86
Agniveer Salary : अग्निवीरला नेमका किती पगार मिळतो? निवृत्तीनंतरची तरतूद किती?
Agniveer Salary : अग्निवीरला नेमका किती पगार मिळतो? निवृत्तीनंतरची तरतूद किती?
  • ऋजुता लुकतुके

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गेल्या महिन्यात झालेल्या अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी ६.२१ लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यात संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भऱ भारतच्या सामुग्री उत्पादन योजना तर होत्याच, शिवाय अग्निवीर योजनेवरील खर्चही साधारण १.१२ लाख कोटी रुपयांच्या वर आहे. संरक्षण दलातील कर्मचारी वर्गाचा पगार आणि निवृत्ती वेतन यावर सरकारचा वारेमाप खर्च होतो तो कमी करण्यासाठी सरकारने अग्निवीर योजना आणली. या अंतर्गत ४ वर्षांसाठी अग्निवीर म्हणून तरुणांची भारतीय सैन्य दलात भरती केली जाते. आणि त्यानंतर दरवर्षी एक चतुर्थांश अग्निवीरांना नियमित सैन्यात सामील करून घेतलं जातं. तर उर्वरित अग्निवीरांना काही रक्कम निवृत्तीवेतन म्हणून देऊन त्यांची सेवा खंडित करण्यात येते. अशी तात्पुरती सैन्यसेवा बजावणाऱ्यांना अग्निवीर असं नाव सरकारने दिलं. (Agniveer Salary)

(हेही वाचा- ऑलिम्पिक खेळांसाठी मोठे योगदान देणारे माजी हॉकीपटू Viren Rasquinha यांच्याविषयी तुम्हाला माहिती आहे का ?)

अग्निवीरांना नेमका पगार किती असेल आणि त्यांना काय निवृत्तीवेतन मिळेल ते समजून घेऊया,

साडे सतरा ते २३ वर्ष वयोगटातील महिला व पुरुष भारतीय नागरिकांना अग्निवीर योजनेत सहभागी होता येतं. शैक्षणिक पात्रता ८, ९, १० किंवा १२ वी पास अशी आहे. तुमच्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे तुम्हाला कामं दिली जातील. अग्निवीराचा कार्यकाल ४ वर्षांचा असेल. आणि यात तुम्हाला मासिक किमान ३०,००० रुपये इतकं वेतन मिळेल. याशिवाय सैन्यदलाला कार्यकाल बजावताना लागू असलेले भत्तेही अग्निवीराला लागू होतील. इतर भत्ते हे इतर सरकारी भत्त्यांप्रमाणेच महागाई भत्ता, प्रवास भत्ता, घरभाडे भत्ता असे आहेत. शिवाय सैन्यदलात खास गणवेश देखभालीचा भत्ता, रेशन भत्ता, प्रवास भत्ता व कामाच्या जागी अडचणींसाठी मिळणारा भत्ते असे स्वतंत्र चार भत्ते दिले जातील. (Agniveer Salary)

(हेही वाचा- आता अटल सेतू मार्गावरुन NMMT ची बस धावणार)

अग्निवीराची सेवा ४ वर्षं असल्यामुळे दरवर्षी पगारात वाढ होईल. ती पुढील प्रमाणे असेल.

सेवेचं वर्ष

महिन्याचं वेतन

हातात येणारं वेतन

अग्निवीर कॉर्पस फंडात अग्निवीराने द्यायचा निधी (मासिक)

कॉर्पस फंडात सरकार देणार असलेला वाटा

पहिलं

३०,०००

२१,०००

९,०००

९,०००

दुसरं

३३,०००

२३,१००

९,९००

९,९००

तिसरं

३६,५००

२५.६५०

१०,९५०

१०,९५०

चौथं

४०,०००

२८,०००

१२,०००

१२,०००

 

अग्निवीर सेवेची चार वर्षं पूर्ण झाली की, त्यावर्षीच्या अग्निवीरांपैकी २५ टक्के लोकांना भारतीय सैन्यादलात कायमस्वरुपी भरती करून घेतलं जाईल. उर्वरित अग्निवीरांना चार वर्ष पूर्ण झाल्यावर सेवानिधी पॅकेजच्या स्वरुपात ११.७१ लाख रुपये तात्काळ दिले जातील. त्यासाठी अग्निवीर सेवानिधी तयार करण्यात आला आहे. याशिवाय अग्निवीर म्हणून सेवा बजावताना तुम्हाला ४८ लाखांचा आरोग्य विमा मिळेल. तसंच सेवा बजावताना मृत्यू आल्यास तुमच्या सर्वात जवळच्या नातेवाईकांना ४४ लाख रुपये मिळतील. आणि अपंगत्व आल्यास व्यंगाच्या स्वरुपानुसार, अनुक्रमे ४४ लाख, २५ लाख आणि १५ लाख रुपये एवढी रक्कम मिळेल. अग्निवीराला दरवर्षी ३० दिवसांची सुटी मिळेल. तसंच सैन्यदलातील कर्मचाऱ्यांप्रमाणेच त्यांनाही वैद्यकीय सुविधा आणि कॅन्टिन सेवाही मिळतील. (Agniveer Salary)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.