पाकिस्तानातील मशिदींवरील हल्ले सुरूच; आधी बाॅम्बस्फोट, आता तोडफोड

178

नुकतेच पाकिस्तानात एका मशिदीमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणला होता, त्यामध्ये १०० जणांचा मृत्यू झाला, या घटनेचे पडसाद कमी होत नाही तोच पाकिस्तानातील आणखी एका मशिदीवर हल्ला करण्यात आला. कराचीमध्ये दिवसाढवळ्या हल्ला करत एका अहमदिया मशिदीची नासधूस करण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तानचा हल्ला 

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, कराचीमधील हाशू मार्केट येथे कादियानी मशिदीवर कट्टरवाद्यांनी हल्ला केला. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. यामध्ये कट्टरवादी मशिदीवर चढून तोडफोड करत असल्याचे दिसत आहे. मशिदीची नासधूस करणारे तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तानचे (TLP) सदस्य असल्याचा दावा आहे. हे प्रार्थनास्थळ अहमदिया समुदायाचे असल्यानेच त्यावर हल्ला करण्यात आल्याचे समजते.धर्मांधांनी अहमदी समाजाच्या मशिदीवर हल्ला केला. पोलीस त्यांना रोखू शकले नाहीत. काही लोकांनी आपली तोंडे लपवली होती. तर काही मात्र जाहीरपणे तोडफोड करत होते. त्यांना आपली ओळख उघड होत असल्याचीही भीती नव्हती. धर्मांध शिडीच्या सहाय्याने मशिदीच्या छतावर पोहोचले आणि मिनार तोडू लागले. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु असल्याचे सांगितले. कादियानी मशिदीवर हा एका महिन्यात झालेला दुसरा हल्ला आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या पेशावरमध्ये आत्मघाती हल्ला झाल्याने आधीच खळबळ माजली आहे. या हल्ल्यात 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस आहेत.

(हेही वाचा World cancer day : आकडे सांगतायेत पुढे धोका आहे)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.