आठ तासांची झुंज व्यर्थ; कोपर्डीत बोअरवेलमध्ये पडून पाच वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू

139

अहमदनगरच्या कर्जत तालुक्यातील कोपर्डीत बोअरवेलमध्ये पडल्याने पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. 11 फूट खाली अडकलेल्या मुलाला वाचवण्यासाठी NDRH च्या पाच पथकांनी प्रयत्न केले. मुलाला रात्री उशिरा बोअरवेलबाहेर काढण्यात यश देखील आले. परंतु, चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. तब्बल साडे आठ तास हा चिमुकला बोअरवेलमध्ये अडकला होता.

कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे शेतातील बोरवेलमध्ये ऊसतोड कामगाराचा पाच वर्षाचा मुलगा खेळताना सोमवारी सायंकाळी सहा वाजता पडला. सागर बुधा बरेला असे या चिमुकल्याचे नाव आहे. रात्री अडीच वाजपेर्यंत त्याला बोअरवेलमधून काढण्यासाठी बचावकार्य सुरु होते. एनडीआरएफच्या पाच पथकाकडून हे बचावकार्य सुरु होते.

( हेही वाचा: मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण लवकर पूर्ण होणार )

आठ तासांची झूंज व्यर्थ 

बोअरवेलच्या 15 फूट खोलीवर हा मुलगा असल्याचे जाणवत होते, त्याला वाचण्यासाठी समांतर दोन जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करण्यात आले. घटनास्थळी कुळधरण प्राथमिक आरोग्य केंद्रासह उपजिल्हा रुग्णालयाची टीम, कर्जत नगरपंचायतचे अग्निशमन दल यांच्यासह महसूल प्रशासन तळ ठोकून होते. मात्र, रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास मुलाला बाहेर काढण्यात आले, त्यावेळी तो मृत असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.