कॉलेज ट्रस्टीच्या मुलीनेच फोडला 12 वीचा पेपर; क्राईम ब्रांचच्या तपासात धक्कादायक खुलासा

बारावीच्या परीक्षा 21फेब्रुवारीपासून सुरु झाल्या आहेत. बुलढाण्यापाठोपाठ मुंबईच्या दादर येथील डाॅक्टर अॅंटोनियो डिसिल्वा हायस्कूल आणि ज्युनियर काॅलेजमध्ये गणिताचा पेपर फुटला. यानंतर मुंबईच्या क्राईम ब्रॅंचने या पेपरफुटी प्रकरणाचा तपास केल्यानंतर खळबळजनक खुलासा झाला आहे. या पेपरफुटीचे मुळ कनेक्शन अहमदनगरमध्ये सापडले आहे. अहमदनगर काॅलेज ट्रस्टीच्या 23 वर्षांच्या मुलीनेच बारावीचा पेपर फोडल्याचे तपासात उघड झाले आहे. पेपर फोडण्यामागे धक्कादायक कारण समोर आले आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

बुलढाण्याच्या सिंदखेडराजामध्ये सकाळी 10:30 वाजल्यापासून गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर डाॅक्टर अॅटोनियो डिसिल्वा हायस्कूल आणि ज्यूनियर काॅलेजमध्ये देखील गणिताचा पेपर फुटला होता. विद्यार्थी परीक्षाकेंद्रात जाण्यासाठी 23 मिनिटे उरले असतानाच सकाळी 10:17 मिनिटांनी एका विद्यार्थ्याला व्हाॅट्सअॅपवर गणिताचा पेपर आला. विद्यार्थी परीक्षा केंद्रात परवानगी नसतानाही मोबाईल फोन घेऊन गेला. त्यांचा फोन तपासला असता त्यात गणिताचा पेपर आढळला होता. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

( हेही वाचा: प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना दिलासा )

मुंबई क्राईम ब्राॅंचची कारवाई

बारावीचा गणिताचा पेपर फोडल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अहमदनगरमधून पाच जणांना अटक केली आहे. मुंबई क्राईम ब्रॅंचच्या युनिट वनने नगरच्या रुई छत्तीसी गावात जाऊन अत्यंत गुप्तपणे ही कारवाई केली. पाच जणांना अटक करुन पुढील कारवाईसाठी मुंबईला नेण्यात आले आहे.

अटक केलेल्यांमध्ये अहमदनगरच्या मातोश्री भागुबाई भांगरे अॅग्रीकल्चर अॅंड सायन्स ज्युनिअर काॅलेजचे प्रिन्सिपल भाऊसाहेब अमृते, काॅलेज टीचर किरण दिघे, सचिन महानोर, ड्रायव्हर वैभव तरटे आणि काॅलेज ट्रस्टीची मुलगी अर्चना भांबरे यांचा समावेश आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here