अहमदनगर जिल्हा रुग्णालय आग प्रकरणी चौकशी समिती स्थापन

133

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला ६ नोव्हेंबरला सकाळी साडेदहा वाजता शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या विभागात एकूण १७ रुग्ण होते. त्यापैकी दहा जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी दिली. दरम्यान, दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंवेदना व्यक्त केली असून याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करून चौकशी समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत.

असा घडला प्रकार

अहमदनगर जिल्हा रुग्णालयाला भीषण आग लागली आहे. जिल्हा रुग्णालयातील आयसीयू रुग्णालयात ही आग लागली असून १० रुग्णांचा मृत्यू झाला. आयसीयू वॉर्डात ज्यावेळी ही आग लागली त्यावेळी एकूण २० रुग्ण उपचार घेत होते. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. यासोबतच रुग्णालयातील नर्सेस, वॉर्ड बॉय आणि डॉक्टरांच्या मदतीने रुग्णांना इतरत्र हलविण्यास सुरुवात केली. ही आग इतकी भीषण होती की, संपूर्ण रुग्णालयात धुराचे लोट पसरले आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली आहे याची माहिती मिळू शकलेली नाहीये. आयसीयू वॉर्डात लागलेल्या या आगीने अवघ्या काही क्षणात संपूर्ण वॉर्डला आपल्या विळख्यात घेतले

चौकशी समिती स्थापन

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये झालेल्या आगीच्या घटनेच्या चौकशीसाठी महसूल विभागीय आयुक्त नाशिक यांच्या अंतर्गत खालील सदस्यांसह समिती स्थापन करण्यात आली आहे. यात खालील आठ अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे.

१. डिव्हिजन कमिशनर, नाशिक विभाग राधाकृष्ण गमे – अध्यक्ष
२. डि. एच. एस. कार्यालय मुंबईतील जी. टी. संचालक रुग्णालय
३. HEMR आरोग्य उपकरणे देखभालीसाठी डि. एच. एस. सहाय्यक संचालक
४. संचालक अग्निसुरक्षा मुंबईचे प्रतिनिधी
५. जिल्हाधिकारी अहमदनगर यांचे प्रतिनिधी
६. अहमदनगर महानगरपालिकेचे प्रतिनिधी (अग्निसुरक्षा अधिकारी)
७. डि. एच. एस. द्वारे नियुक्त केलेला एक चिकित्सक
८. उपसंचालक आरोग्य सेवा नाशिक परिमंडळ – सदस्य सचिव

(हेही वाचा – पुन्हा रुग्णालयाला आग! नगरमध्ये १० रुग्णांचा मृत्यू)

फायर ऑडिट करूनही दुर्घटना

नाशिक येथे रुग्णालयात झालेल्या गॅस गळतीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयाचे फायर ऑडिट करण्यात आले होते. तरीही ही दुर्दैवी घटना घडली आहे. यासाठी याबाबतची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. असे, जिल्हाधिका-यांनी स्पष्ट केले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.