दिल्लीतील AIIMS रुग्णालयात सायबर अॅटक; दोन कर्मचाऱ्यांचे निलंबन

130

दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) चे सर्व्हर गेल्या दोन दिवसांपासून डाउन आहे. सर्व्हर डाऊन झाल्यामुळे एम्स प्रशासनाने एसओपी जारी केला आहे. यानुसार रूग्णांना रूग्णालयात दाखल करणे, डिस्चार्ज करणे आणि त्यांना हस्तांतरित करणे हे मॅन्युअली केले जाणार आहे. एवढेच नाही तर जन्म-मृत्यूचे दाखलेही हाताने बनवले जात आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव एम्सचा लॅन इंटरनेट सर्व्हरही गुरुवारी संध्याकाळी बंद करावा लागला. सध्या एम्स कॅम्पसमध्ये मोबाईल इंटरनेट सेवा वापरली जात आहे. अशातच गुरूवारी संध्याकाळी उशिरा एम्स व्यवस्थापनाने संगणक शाखेशी संबंधित दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.

एम्सवर झालेल्या सायबर हल्ल्यात तब्बल ४ कोटी रूग्णांचा डेटा चोरीला गेला आहे. याप्रकरणी सीबीआय, आयबी, डीआरडीओ, दिल्ली पोलिसांकडून तपास सुरू आहे. ही घटना वैद्यकीय क्षेत्रातील सर्वात मोठं हॅकिंग असून दहशतवाद्यांच्या षडयंत्राचा संशय असल्याचे सांगितले जात आहे.

(हेही वाचा – Shraddha Murder Case: श्रद्धा हत्याकांडप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांची होणार चौकशी?)

दरम्यान, एम्स व्यवस्थापनाने एका निवेदनात रॅन्समवेअऱ सायबर हल्ला झाल्याची भिती व्यक्त केली होती, परंतु सुरक्षा यंत्रणांनी अद्याप कोणतीही पुष्टी केलेली नाही. एम्स नवी दिल्ली सर्व्हर हॅक झाल्याप्रकऱणी दिल्ली पोलिसांच्या आयएफएसओ युनिटने अज्ञांताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुरूवारी साधारण ११-१२ तास सर्व्हर डाऊन झाल्यानंतर एम्सच्या सुरक्षा अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलीस तपास करत आहेत.

सर्व्हरवर रॅन्समवेअर हल्ला

AIIMS ने एका निवेदनात म्हटले आहे की, एम्समध्ये काम करणाऱ्या नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरच्या (NIC) टीमने माहिती दिली की, हा रॅन्समवेअर हल्ला असू शकतो. योग्य कायद्याची अंमलबजावणी करणारे अधिकारी चौकशी करतील. डिजिटल सेवा पुनर्संचयित करण्यासाठी पावले उचलली जात आहेत आणि इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) आणि NIC ची मदत घेतली जात आहे. त्याचबरोबर भविष्यात असे हल्ले होऊ नयेत यासाठी एम्स आणि एनआयसी योग्य ती खबरदारी घेतील. तर एम्सच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, सर्व्हर बंद झाल्यामुळे स्मार्ट लॅब, बिलिंग, अहवाल तयार करणे आणि अपॉइंटमेंट सिस्टमसह ओपीडी आणि आयपीडी डिजिटल हॉस्पिटल सेवा प्रभावित झाल्या आहेत

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.