Video: एअर इंडियाच्या विमानाचे थरारक इमर्जन्सी लँडिंग, टळला मोठा अपघात

192

केरळच्या कालिकतहून सौदी अरेबियाला जाणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने तिरुअनंतपुरम विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. या विमानात 182 प्रवासी असल्यामुळे सुरक्षित लँडिंग झाल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

यासंदर्भातील माहितीनुसार एअर-इंडिया एक्सप्रेस IX 385 या विमानाने शुक्रवारी सकाळी कालिकत येथून सौदी अरेबियाच्या दम्मामकडे उड्डाणे केले होते. मात्र, उड्डाणावेळी विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला. यामुळे विमानाच्या हायड्रोलिक गियरमध्ये बिघाड झाला. यानंतर या विमानाचे दुपारी 12 वाजून 15 मिनिटांनी तिरुअनंतपुरममध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. यावेळी विमानात 182 प्रवासी प्रवास करत होते. अचानक विमान तिरुअनंतपुरमकडे वळवण्यात आल्याने येथील विमानतळावर आणीबाणी घोषित करण्यात आली होती.

टेकऑफवेळी विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळल्यानंतर वैमानिकाने प्रसंगावधान दाखवत विमानातील इंधन अरबी समुद्रात रिकामे केले. त्यानंतर तिरूअनंतपुरम येथील विमानतळावर सुरक्षित लँडिंग केले. ज्यावेळी हे विमान तिरूअनंतपुरम विमानतळावर उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी संपूर्ण विमानतळावर आणीबाणी लागू करण्यात आली होती. दरम्यान, वैमानिकाच्याप्रसंगावधाने या विमानाचा मोठा अपघात टळला असून, 182 प्रवाशांची जीव वाचला आहे.

(हेही वाचा – कोकण रेल्वे मार्गावर आणखी दोन गाड्या धावणार विद्युत वेगाने!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.