युक्रेन-रशियामध्ये तणाव सुरु आहे. दरम्यान भारतीयांसाठी आनंदाची बातमी म्हणजे युक्रेनमध्ये अडकलेले 242 भारतीय मायदेशी परतले आहेत. यापैकी बहुतेक जण युक्रेनमध्ये मेडीकलचे शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत. युक्रेनमधून परतलेल्या अनेक भारतीय विद्यार्थ्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तर दूसरीकडे आणखीन काही भारतीयांना आणायला गेलेलं विमान अर्ध्यातून माघारी परतल्याची माहिती समोर आली आहे. रशियाने युक्रेनवर हा हल्ला करताना विमानतळ आणि लष्करी ठिकाणांवर हल्ला करण्यात आला. या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव युक्रेनने त्यांचे हवाई क्षेत्र बंद केले आहे.
किवमध्ये NOTAM जारी केल्याने घेतला निर्णय
दरम्यान, भारतीयांना आणण्यासाठी गेलेलं विमान परत येत आहे. एअर इंडियाच्या विमानाने युक्रेनची राजधानी किवला जाण्यासाठी उड्डाण केलं. मात्र आता ते भारतीयांना आणायला गेलेलं विमान दिल्लीला परत येत आहे. यासंदर्भात एअरलाइन्सच्या प्रवक्त्यांनी असे म्हटलं, एअर इंडियाचं AI 1947 विमान परत येत आहे. कारण किवमध्ये NOTAM जारी करण्यात आले आहे.
Air India flight AI1947 is coming back to Delhi due to NOTAM (Notice to Air Missions) at, Kyiv, Ukraine. pic.twitter.com/C6OKj7xMF9
— ANI (@ANI) February 24, 2022
(हेही वाचा – मलिकांचा हात वेश्या व्यवसायातही! भाजपचा सनसनाटी आरोप)
युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी एअरमनना नोटीस जारी केली आहे. यानुसार गुरुवारी सकाळी युक्रेनमधील सर्व नागरी विमान उड्डाणांवर बंदी घालण्यात आली आहे. एअर इंडिया आणि केंद्र सरकारने या नोटीस नंतर विमान दिल्लीला परत बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीला परतण्यासाठी विमानाने इराणच्या हवाई क्षेत्रात युटर्न घेऊन माघारी येण्याचा निर्णय घेतला.
Join Our WhatsApp Community