देशातील कोरोना प्रकरणांमध्ये गेल्या काही दिवसांपासून घट झाली आहे. त्यामुळे विमान वाहतूक क्षेत्र सावरण्यासही सुरुवात झाली आहे. त्यातच आता टाटाने आनंदात भर घातली आहे. एअर इंडिया आपल्या कर्मचा-यांचे पगार टप्प्याटप्प्याने कोरोना महामारीपूर्वीच्या स्तरावर आणण्याचा प्रयत्न करत आहे. शुक्रवारी या संदर्भातील घोषणा टाटा समुहाने केली आहे.
भत्त्यात वाढ करण्यात आली
एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर, वैमानिकांचा उड्डाण भत्ता, विशेष वेतन आणि वाइड बाॅडी भत्ता अनुक्रमे 35 टक्के, 40 टक्के आणि 40 टक्के कपात करण्यात आला आहे. यावर्षी 1 एप्रिलपासून हे तीन भत्ते 20 टक्के, 25 टक्के आणि 25 टक्के केले जात आहेत.
( हेही वाचा: ‘पुरंदरे’ माहितीचा स्त्रोत नव्हते; जेम्स लेन यांचा खुलासा! )
लवकरच भत्ते महामारीपूर्वीच्या स्तरावर आणले जाणार
कोरोना महामारीच्या काळात केबिन क्रू मेंबर्सचा उड्डाण भत्ता 15 टक्क्यांनी तर वाइड बाॅडी भत्ता 20 टक्क्यांनी कमी करण्यात आला होता. 1 एप्रिलपासून मात्र तो वाढवण्यात आला आहे. तसेच, अधिका-यांचा भत्ता 25 टक्क्यांवर आणला जात आहे. तसेच इतर कर्मचा-यांचे भत्ते महामारीपूर्वीच्या स्तरावर आणले जात आहेत. वैमानिकांच्या ओव्हरटाइम वेतनाचा पुन्हा आढावा घेण्यात आला असून, त्यासाठी स्वातंत्रपणे चर्चा केली जात आहे. त्यानुसार कर्मचा-यांना माहिती दिली जाणार आहे. असे एअर इंडियाने म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community