इस्रायलने १ एप्रिलला सिरीयाची राजधानी दमास्कस येथे असलेल्या इराणच्या दूतावासावर हल्ला केला होता. त्यापूर्वी इराणचे समर्थन असलेल्या हुती बंडखोरांनी इस्रायलमधील लष्करी तळांवर हल्ले केले होते. या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. इराण आणि इस्रायलमधील (Iran-Israel) तणाव वाढतच आहे. इराण कधीही इस्रायलवर हल्ला करण्याची शक्यता आहे. याचा परिणाम आता हवाई सेवांवरही होत आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, शनिवारी (१३ एप्रिल) एअर इंडियाच्या विमानांनी इराणच्या हवाई हद्दीतून जाणे बंद केले आहे. इराणने इस्रायलवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे इराणची हवाई हद्द टाळत युरोपला जाणारी एअर इंडियाची उड्डाणे त्यांच्या गंतव्य स्थानासाठी दूर अंतरावर जात आहेत, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे.
(हेही वाचा – Nilam Gorhe: “कोणाचे दिवस आलेत आणि कोणाचे दिवस भरलेत लवकरच कळेल”, नीलम गोऱ्हेंची उद्धव ठाकरेंवर टीका )
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी आठवड्याच्या सुरुवातीला इशारा दिला होता की, “कोणत्याही देशातील वाणिज्य दूतावास आणि दूतावास कार्यालये हा त्या देशाचा भाग असतात. जेव्हा त्यांनी आमच्या दूतावासावर हल्ला केला, तेव्हा याचा अर्थ त्यांनी आमच्या प्रदेशावर हल्ला केला आहे. त्यांच्या सल्लागारांपैकी एकाने असेही म्हटले की, इस्रायली दूतावास फारसे सुरक्षित नाहीत.
मध्य पूर्वेत मोठे युद्ध होण्याची शक्यता…
अमेरिकेसह अनेक देशांच्या गुप्तचर संस्थांचे म्हणणे आहे की, इराण रविवारपर्यंत इस्रायलला प्रत्युत्तर देऊ शकतो. जर हा हल्ला झाला तर मध्य पूर्वेत मोठे युद्ध होऊ शकते. दोन्ही देशांमधील प्रॉक्सी वॉर बऱ्याच काळापासून सुरू आहे, परंतु आता थेट युद्धाचा धोका निर्माण झाला आहे. २०२० मध्ये इराणचा मुख्य कमांडर कासिम सुलेमानी इस्रायली हल्ल्यात मारला गेला तेव्हा असेच तणावपूर्ण वातावरण दिसले होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community