विमान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांची तस्करांना मदत, १८ किलो सोने काढले बाहेर

95

सोने तस्करीसाठी मदत करणाऱ्या खाजगी विमान कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांना डीआयआरने अटक केली आहे. या दोघांनी मागील काही महिन्यांपासून १८ किलो सोने विमानतळावरून बाहेर काढण्यास तस्करांना मदत केल्याची माहिती समोर आली आहे. या तस्करीच्या धंद्यात विमान कंपन्यांचे आणखी काही कर्मचारी सहभागी असल्याचा संशय डीआयआरने व्यक्त केला आहे.

( हेही वाचा : जॅकलिन फर्नांडिसला ईडीचा दणका! ७.२७ कोटींची मालमत्ता जप्त )

२ किलो सोने जप्त

दशरत सावंत आणि गणेश पाटील अशी अटक करण्यात आलेल्या विमान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. हे दोघे विमान कंपनीत हाऊस किपर म्हणून काम करीत होते. या दोघांच्या मदतीने सोने तस्करी करणारे सोने विमानतळातून बाहेर काढत होते. डीआयआरने या दोघांजवळून २ किलो सोने जप्त केले आहे.

१० वेळा सोने तस्करी

फेब्रुवारीपासून आतापर्यंत या दोघांच्या मदतीने तस्करांनी १८ किलो सोने तस्करी केल्याचा संशय डीआरआयला आहे. या दोघांना एका खेपेमागे तस्करांकडून ८ ते १० हजार मिळत होते अशी माहिती समोर आली आहे. दुबई-मुंबई फ्लाइटच्या वॉशरूममध्ये तस्करांनी सोन्याचे बार लपवून ठेवल्याची गुप्त माहिती डीआयआरच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती, डीआयआर अधिका-यांनी कारवाईवर कडक नजर ठेवली मात्र काहीही निष्पन्न झाले नाही. काही तासांनंतर त्यांना विमानतळाबाहेर सोने नेण्यात आल्याची माहिती मिळाली. गुप्त माहितीच्या आधारे, डीआरआय अधिकार्‍यांनी पाटीलला ताब्यात घेतले, त्याने हे सोने बुटामध्ये लपवून बाहेर आणल्याची कबुली दिली आणि नंतर ते अंधेरीतील बस स्टॉपजवळील गोदामाच्या मागे सोडले, तेथून सावंत हा पार्सल उचलणार होता, दरम्यान अधिकाऱ्यांनी सापळा रचून सावंत हा पार्सल घेण्यासाठी आला असता त्याला अटक केली. अधिकाऱ्यांनी १.१ कोटी रुपये किमतीच्या १,०६७ ग्रॅम आणि १.०६८ ग्रॅम सोन्याच्या १८ बार जप्त केले.

चौकशीदरम्यान, या दोघांनी सांगितले की ते अरमान, अहमद आणि सय्यद यांच्यासाठी काम करतात आणि त्यांना प्रत्येकी ८ ते १० हजार रुपये दिले जायचे. या दोघांनी फेब्रुवारीपासून १० वेळा सोन्याची तस्करी केल्याचे सांगितले आणि एअरलाइन्सच्या अन्य कर्मचाऱ्यांचीही नावे उघड केली असून त्यांचा शोध घेतला जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.